इकडे वाघ, तिकडे हत्ती; वनविभाग दुहेरी संकटात!

नियंत्रणासाठी जिल्ह्यात प्रशिक्षित चमू दाखल

गडचिरोली : जिल्ह्यातील मुरुमगाव वनपरिक्षेत्र आणि देसाईगंज येथे वाघ आणि रानटी हत्तींच्या रहिवासी भागातील संचारामुळे वनविभाग दुहेरी संकटात सापडला आहे. दोन्ही वन्यप्राण्यांना नियंत्रणात आणण्यासाठी दोन प्रशिक्षित चमू जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत...

अनेक नागरिकांचे बळी घेणाऱ्या सीटी १ या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची एक चमू जंग जंग पछाडत आहे तर दुसरी चमू रानटी हत्ती रहिवासी भागात येऊ नये म्हणून रात्र रात्र जागून त्यांना पळवून लावण्याचे काम करीत आहे. गेल्या दोन वर्षापासून
स्थलांतरित वाघांमुळे गडचिरोली जिल्ह्यात तीसपेक्षा अधिक बळी गेले.

दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढतच आहे. आजपर्यंत या वाघांनी शेकडो पाळीव जनावरे फस्त केलीत. त्यामुळे परिसरात कायम दहशतीचे वातावरण असते. सध्या देसाईगंज तालुक्यात सीटी १ या नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला असून अनेक लोकांचा बळी घेतला आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने ताडोबा येथून प्रशिक्षित चमू बोलाविली असून कालपासून या चमूने वाघाचा शोध सुरू केला आहे. सध्या हा वाघ आरमोरी वनपरिक्षेत्रात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, कधी नव्हे ते रानटी हत्तींचा कळप परत आल्याने मरुमगाव वनपरिक्षेत्र चर्चेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post