खातेवाटपानंतर एकनाथ शिंदेंचे 5 मंत्री नाराज

एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाचा निर्णयही झाला आहे, पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातले 5 मंत्री नाराज झाले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

*तर दुसरीकडे दादा भुसे यांचा फोन स्विच ऑफ येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दादा भुसे यांना बंदरे व खनिकर्म, गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता, दिपक केसरकर यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन तर संदिपान भुमरे यांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन ही खाती देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी आधीच नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपने स्वत:कडे महत्त्वाची खाती घेतली आहेत.*




*राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर*
 
मुंबई, दि. 14: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. 

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

*इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:*

*सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील -*
महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

*सुधीर मुनगंटीवार-*
वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

*चंद्रकांत पाटील-*
उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

*डॉ. विजयकुमार गावित-*
 आदिवासी विकास

*गिरीष महाजन-*
ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 

*गुलाबराव पाटील-*
पाणीपुरवठा व स्वच्छता 

 *दादा भुसे-*
बंदरे व खनिकर्म 

*संजय राठोड-*
अन्न व औषध प्रशासन

*सुरेश खाडे-*
 कामगार

 *संदीपान भुमरे-*
रोजगार हमी योजना व फलोत्पादन

 *उदय सामंत-*
 उद्योग

 *प्रा.तानाजी सावंत-*
 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

*रवींद्र चव्हाण -*
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

*अब्दुल सत्तार-*
कृषी

*दीपक केसरकर-*
शालेय शिक्षण व मराठी भाषा

*अतुल सावे-*
सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

*शंभूराज देसाई-*
 राज्य उत्पादन शुल्क

*मंगलप्रभात लोढा-*
पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास



Post a Comment

Previous Post Next Post