आरमोरी तालुका ओला दुष्काळ जाहिर करून पीक कर्ज लवकर माफ करून शेतक-यांना एकरी 50 हजार मदत जाहीर करण्यात यावे आरमोरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदिप ठाकुर यांच्या नेतृत्वात सरपच्याचा तहशिलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे निवेदनातून मागणी

आरमोरी - तालुक्यात झालेल्या अतिवृष्टिण शेतीचे अतोनात नुकसान झालेले असुन, शेतक-यांच्या हाता तोंडशी आलेले धानाचे पिक उध्वस्त झालेले आहे. आज संपुर्ण शेतकरी वर्ग हा हवालदील झालेला असुण शेतक-यावर नापीकी मुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. अश्या वेळेस शेतक-यांना मदत नाही केली तर शेतक-यांचे संपुर्ण परिवार उघडयावर पडल्या शिवाय राहणार नाही. पर्यायी शेतक-यांवर आणि त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. करिता आपणास नम्र विनंती की आरमोरी तालुक्यातील शेतक-यांचे संपुर्ण कर्ज माफ करून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना एकरी 50 हजार रूपये मदत जाहीर करण्यात यावे अशी आरमोरी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदिप ठाकुर यांच्या नेतृत्वात सरपच्याचा तहशिलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे निवेदनातून मागणी केली आहे.
यावेळी विविध गावांतील सरपंच विलास असेंडी डमंबाजी हुलके ध्यानेश्वर धरणे सरपंच वासुदेव मंडलवार सरपंच सौ जयश्री दडमल सौ रत्नमाला सेलोटे सौ शुभांगी मसराम प्रदीप कुमरे विलास बावणे सौ छाया खरकटे सौ संगीता पेदाम सौ वैशाली डोंगरावर सौ शुभांगी गेडाम सौ शीतल धोटे मिथुन प्रधान पुरुषोत्तम दोनदकर सौ श्यामदेवी सहारे सौ कुकडकर मॅडम श्री ईश्वर कुले सौ मडावी मॅडम सौ प्रियांका गेडाम सौ कोसरे मॅडम श्री राजेश लिंगायत सौ कुंदा नारनवरे खुशाल वलादी मयूर कोडप बालाजी गेडाम उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post