भाजप नेता भाजप महीला नेत्यासोबत रोमान्स करताना पत्नीने पकडले... अन् झाली धुलाई

कानपूर,:- भाजपा नेते मोहित सोनकर यांना एका भाजपा महिला नेत्यासोबत रोमान्स करणे चांगलेच महागात पडले आहे. सोनकर हे भाजपाच्या एका महिला नेत्यासोबत बंददाराआड रोमान्स करत होते. तेव्हा अचानक त्यांची पत्नी तिथे आली. आपले पती मोहित यांना दुसऱ्याच महिलेसोबत पाहून त्यांच्या पत्नीला राग अनावर झाला. त्यांनी मोहित यांना शिव्या देत चपलेने मारायला सुरुवात केली. या प्रकरणाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमध्ये सोनकर यांच्या पत्नी त्यांना चपलेने मारताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा मोहित सोनकर यांना त्यांची पत्नी मारत होती,तेव्हा पोलिसदेखील घटनास्थळी हजर होते. पत्नी पतीला चपलेने मारत असताना पोलिस काहीच करू शकले नाही. हा सर्व प्रकार शनिवारी रात्री घडला. मोहित यांची पत्नी एकटी नव्हती तर त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्त देखील होते.

महिलेलाही मारहाण

दरम्यान या सर्वप्रकरणात संबंधित भाजपाच्या महिला नेत्यालादेखील मारहाण करण्यात आली आहे. मोहित आणि त्या महिलेला चांगलेच चपलेने मारण्यात आले. व्हीडिओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. आता या दोन नेत्यांविरोधात पक्ष काय कारवाई करणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post