आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने क्रांतिदिन व जागतिक अदिवासी दिन साजरा

दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधी 
सुपर फाष्ट गडचिरोली 7822082216

गडचिरोली:- आज दिनांक ९ऑगस्ट २०२२ इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला आपचे जिल्हा संयोजक श्री बाळकृष्ण सावसाकडे यांच्या हस्ते तसेच जिल्हा सचिव भास्कर इंगळे यांच्या हस्ते शहिदेआजम भगत शिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पुष्प अर्पण करून क्रांतीविरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, इनक्लाब जिंदाबाद, वंदे मातरम्, क्रांती दिन चिरायू होवो, बिरसा मूंडा अमर रहे,अशा घोषना देन्यात आल्या. क्रांती कारकांच्या विच्यारांची देशाला खरी गरज आहे. असे विच्यार आत्मसात करावे असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला आम आदमी पार्टीचे कोषाध्यक्ष संजय जीवतोडे ,संघटनमंत्री डॉ देवेंद्र मुंघाटे,शहर संयोजक कैलास शर्मा, प्रमोद वाटे,विलास खांडेकर, नामदेव पोले,संतोष कोटकर, समिता गेडाम,सोनल नन्नावरे,मीनाक्षी खरवडे,अल्का गजबे, भास्कर आत्राम,मनोज गोलदार,पुरुषोत्तम बांबोळे, शुभांगी मरघडे इत्यादी कार्यकर्ता व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. अल्पोपहार व चाहापाना नंतर उपस्थितांचे आभार मानण्यातआले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.


Post a Comment

Previous Post Next Post