‘ आधी तू मला घटस्फोट दे मग तुझ्यासमोर दहा पुरुषांशी एकाच वेळी शारीरिक संबंध ठेवेल मात्र तु काहीही करू शकणार नाही ‘ असे आव्हान पत्नीने आपल्या पतीला दिले अन्...

छत्तीसगड:- पती-पत्नी म्हटलं की संसारात भांडण आलेच मात्र अनेकदा एखादा शब्द अत्यंत खराब उच्चारला की संताप अनावर होतो आणि त्यातून अनेक गुन्हे देखील होतात अशीच एक घटना छत्तीसगड येथे समोर आली असून ‘ आधी तू मला घटस्फोट दे मग तुझ्यासमोर दहा पुरुषांशी एकाच वेळी शारीरिक संबंध ठेवेल मात्र तु काहीही करू शकणार नाही ‘ असे आव्हान एका पत्नीने तिच्या पतीला दिले त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने तिचा खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह यास गळफास घेऊन हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या प्रकारचा प्रकरणाचा भांडाफोड केलेला आहे. छत्तीसगडच्या बेमेतरा या जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सेमरिया परिसरात दोघे पती-पत्नी राहत होते त्यावेळी पतीने दोन महिन्यापूर्वी आपले पत्नीसोबत पटत नाही अशी तक्रार नोंदवली होती. आपण पत्नीसोबत लखनऊ येथे कामासाठी गेलो होतो त्यावेळी आपण पत्नीला परपुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले अशी तक्रार नोंदवण्यावरून पती आणि पत्नी यांच्यात भांडणे झाली होती असे म्हटले होते.

पाच जुलै रोजी लखनऊ इथून दोघे आपल्या राहत्या घरी पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांना घटस्फोट देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली मात्र ही प्रक्रिया सुरू असतानाच पती-पत्नी जोरदार भांडणे झाली त्यावेळी पत्नीने तिच्या पतीला ‘ तुला घटस्फोट द्यायचा असेल तर दे मात्र आधी हे घर मला दे आणि एकदा घटस्फोट झाला तर तुझ्याचसमोर दहा जणांच्या सोबत तुझ्यासमोर इथेच शारीरिक संबंध ठेवीन काय करायचे ते कर ‘ असे ती म्हणाली त्यामुळे पतीचा संताप अनावर झाला आणि त्याने तिचा खून केला.

आपल्या हातून पतीचा खून झाल्यानंतर आता आपल्याला शिक्षा होणार या भावनेने संतप्त पतीने तिचा मृतदेह खोलीत आणला आणि त्यानंतर तिला गळफास देऊन तिने आत्महत्या केलेली आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही आत्महत्या नव्हे तर खून आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने झालेल्या प्रकाराची कबुली दिली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post