देसाईगंज येथे कोअर कमेटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड...


---------------------------
देसाईगंज बौध्द समाज:- सल्लागार परिषद व कार्यकर्त्यांची उपस्थिती.
------------------------------
(देसाईगंज):-
देसाईगंज शहर बौध्द समाज कोअर कमेटीतील सदस्यांची व सामाजिक कार्यकर्त्यांची मुख्य सल्लागार परिषदेच्या मार्गदर्शनात सभा आयोजित करुन कोअर कमेटी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
या सभेच्य अध्यक्षस्थानी दि बुध्दिस्ट सोसायटी आँफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष इंजि.नरेश मेश्राम होते. सभेत विजय बन्सोड यांनी विषयानुसार चर्चा घडवून आणली. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य सल्लागार परिषदेचे सदस्य अशोक बोदेले, डाकराम वाघमारे, कुशाब लोणारे, हंसराज लांडगे, मारोती जांभुळकर, अँड.बाळकृष्ण बांबोळकर , राजरतन मेश्राम, अनिरुद्ध शहारे , रमेश रंगारी, जगदीश बद्रे यांनी प्रमुख अतिथीचे स्थान भूषविले.
सभेदरम्यान पदाधिकारी म्हणून अध्यक्ष प्रकाश सांगोळे , ऊपाध्यक्ष साजन मेश्राम, वंदना धोंगडे, सचिव आशिष घुटके, सहसचिव अजय ढोक, कविता निरांजने, कोषाध्यक्ष पवन गेडाम ,प्रवक्ते विजय बन्सोड, प्रसिद्धी प्रमुख राजरतन मेश्राम, अरविंद घुटके यांची निवड करण्यात आली. या सभेला कोअर कमेटीचे सदस्य व बहुसंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.सभेचे संचलन संतोष ऊके यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post