नवी मुंबई मध्ये महत्वाच्या चार दहीहंडी फोडण्यासाठी गोविंद पथकांमध्ये चुरस मिळाला बघायला .

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : कोव्हीडच्या प्रादुर्भावामुळे निर्बंधानंतर गेल्यादोन वर्षापासून थांबलेला दहीहंडीचा उत्साह यंदा पुन्हा पहावयास मिळाला. मुंबई,ठाणे, पुणे, डोंबिवली सह नवीमुंबई शहरातील नागरिकांनी देखील यावेळी दहीहंडीचा थरथराट आणि ढाक्कुमाकुम्...ढाक्कुमाकुम्चा आवाज अनुभवला.यंदा नवी मुंबईत देखीलइतर शहरांप्रमाणे राजकीय दहीहंड्यांची संख्या खूपचदुर्मिळ होती. तरीही दहीहंडीचा उत्साह मात्र पूर्वीप्रमाणेच दिसून आला. नवी मुंबईतील मानाच्याआणि जास्त रक्कमेच्या दहीहंडी फोडण्यासाठी विविध ठिकाणची गोंविदा पथके दुपार१२ नंतर येण्यास सुरुवात झाली. दारवे गाव, सेक्टर-23येथे भाजप युवा मोर्चा चे महामंत्री श्री. रणजीत नाईक यांनीउभारलेली दहीहंडी तसेच सानपाडा, सेक्टर- ८ मध्ये युवा नेतृत्व तसेच दबंग समाजसेवक श्री पांडुरंग आमले यांनी उभारलेली सोन्याची दहीहंडी यावेळी नवी मुंबईतील दहीहंडीचे आकर्षण ठरले.रणजीत नाईक यांच्या दहीहंडीच्या ठिकाणी विविध मान्यवरांनी हजेरी लावली. तर या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. महत्वाचे म्हणजे भाजप युवा मोर्चा चे महामंत्री श्री. रणजीत नाईक यांनी उभारलेली दहीहंडी फोडण्यासाठी दारवे गांव गोविंदा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस दिसून आली.सानपाडा मधील सोन्याची दहीहंडी फोडण्यासाठी देखील मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई मधील विविध गोविंदा पथकांमध्ये चुरस निर्माण झाली होती.

नेरूळ शिरवणे गावामध्ये कै. विनोद
सारिका कला क्रीडा मंडळ आयोजित दहीहंडी उत्सव २०२२ या कार्यक्रम प्रसंगी नवी मुंबईचे मा. महापौर श्री.जयवंत सुतार साहेब मा. सभापती व नगरसेविका सौ. माधुरी ताई सुतार व श्री. जयेंद्र सुतार या कार्यक्रमाला उपस्थित होते या वेली देखीलमुंबई मधील विविध गोविंदा पथकांमध्ये सलामी देण्यासाठी चुरस निर्माण झाली होती.

शिवसेना व युवाशक्ती मित्र मंडळ सीबीडी बेलापूर आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाची क्षणचित्रे या संकल्पघेण्याबरोबर यां कार्यक्रमा प्रसंगी शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक, जिल्हासंघटक व युवाशक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अभिमन्यू कोळी, शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटक व मा. नगरसेविका भारतीताई कोळी, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील, विभाग प्रमुख विजय चांदोरकर, उपविभाग प्रमुख (वाशी) संदीप पवार, शेकडो शिवसैनिक, गोविंदा पथक, महिला, बालगोपाल व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होती या मध्ये देखील बालगोपालां मध्ये दहीहंडी फोडण्यासाठी चुरस निर्माण झाली होती. एकंदरीतच नवी मुंबई शहरातील विविध दहीहंडी फोडण्यासाठी शेकडो गोविंदा पथकांनी पाच ते सात थरलावून सलामी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post