जोगीसाखरा येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

 जोगीसाखरा:- दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी जोगीसाखरा येथे संपन्न झालेल्या आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आरमोरी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मनोजजी काळबाधे तसेच अध्यक्ष म्हणुन सरपंच संदिप ठाकुर विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती च्या मा सदस्य वृंदाताई गजभिये ग्रा.प.सदस्य अश्विनी घोडाम जकास संस्थेचे संचालक यादोराव कहालकर शामराव पेन्दाम बाबुराव टेभुणे देवराव पेन्दाम भाष्कर राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक मनोजजी काळबाधे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुणकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुरुदेव जंकासंस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी केले तर आभार सुनिल कुमरे यांनी मानले या प्रसंगी संपूर्ण गावातील आदिवासी मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

Previous Post Next Post