वाहनात दिड कोटीची रोकड सापडल्याने उडाली खळबळ

देवरी :- तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर देवरी पोलिसांना नाकाबंदी दरम्यान एका वाहनातून सुमारे दिड कोटीची रोकड जप्त केली. ही घटना ८ ऑगस्टच्या रात्री दरम्यानची आहे. या घटनेने मात्र विविध चर्चांना पेव फुटले असून एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, गोंदियावरून वाहन क्र. सीजी ०८/आर. ९००० हे रायपूर जाण्यासाठी निघाले. दरम्यान देवरी लगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ येथे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान त्या वाहनावर संशय आल्याने वाहनाची चौकशी केली असता, वाहनातून १ कोटी | ४३ लाख रुपये आढळून आले. दरम्यान वाहनातील तिघांना चौकशी ताब्यात घेतले तसेच रोकड आपल्या ताब्यात घेतली. ही घटना ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास देवरी पोलिस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांना देवरी पोलिसांनी अटक केली आहे. ही रोख कोठून आली, कोणाला देण्यासाठी जात होते याचा शोध देवरी पोलिस घेत आहेत. अचानक मध्यरात्री कोट्यावधींची रक्कम घेऊन जाताना कार सापडल्याने पोलीस कसून तपास करीत आहेत. ही रक्कम कुणासाठी व कुठे जात होती हा सवाल उपस्थित झाला असून या घटनेने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तपासानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. असे असले तरी, विविध चर्चांना मात्र पेव फटले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post