त्या प्रेमीयुगलांची प्रकृती आता धोक्याबाहेर ....

अहेरी : 'साथ जियेंगे साथ मरेंगे' म्हणत विष प्राशन करून पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या प्रेमीयुगुलावर यशस्वी उपचार होऊन त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यातील बोरी येथील प्रियकर कृष्णा सोनटक्के आणि त्याच्या अल्पवयीन प्रेयसीने सोबत विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

आम्ही आत्महत्या करीत आहोत, अशी चिठ्ठी लिहून हे दोघेही मंगळवारी अहेरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. त्यांनी विषारी द्रव प्यायल्याचा संशय आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे यांनी त्यांना तत्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचीही परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना नंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. त्यांच्या पोटातील विषाचा अंश काढण्यात यशआले.

आता ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याने प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी आपल्या नातेवाईकांसोबत चर्चाही केली. त्यांचे मन वळविण्यात यश येण्याची शक्यता आहे.


समुपदेशनातून आत्महत्येचा विचार दूर करण्याचा प्रयत्न

प्रेम आणि रक्ताच्या नात्यामध्ये एकमेकांना साथ देऊन जीवन जगायचे असते. त्यामुळे प्रेमात किंवा नात्यात कोणताही टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्येसारखा गुन्हा करू नये आणि भावनेच्या भरात न येता खरंच प्रेम असेल तर कायदेशीर मार्गाने प्रेमविवाह करावा, असे आवाहन करत पोलीस विभाग त्यांचे समुपदेशन करत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post