अस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी

धानोरा:- अस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील नियतक्षेत्र झाडापापडा अंतर्गत मासानदी या जंगल परिसरालगतच्या शेतशिवारात घडली, दुर्योधन प्रेमसिंग बेसन (६०, रा. मासानदी) असे जखमी इसमाचे नाव आहे. त्यांना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. दुर्योधन प्रेमसिंग बेसन यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून, उपचारासाठी वनविभागामार्फत पाच हजार रुपये देण्यात आले. नियतक्षेत्र झाडापापडाचे क्षेत्र सहायक बोरकुटे, पेंढरीचे वनरक्षक समर्थ, नरोटे, आत्राम, सोरते, कडते, लेखमी आदींनी पंचनामा पूर्ण केला.

Post a Comment

Previous Post Next Post