३० आगस्टला तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

आरमोरी - तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टर रु. ५०,०००/- (पन्नास हजार रू.) नुकसानभरपाई देण्यात यावी. वाघाच्या दहशतीमुळे ज्या शेतकऱ्यांनी शेती पेरलेली नाही त्यांना हेक्टरी रू. ५०,०००/- नुकसान भरपाई देण्यात यावी. श्रावणबाळ निराधान योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ४ महिण्यापासून थकीत असलेली पेन्शन
त्वरीत देण्यात यावी. व मासिक पेन्शन वाढवून रु. ५,०००/- प्रतिमाह देण्यात यावे. ६० वर्षावरील सर्व शेतकरी, शेतमजूर, कामगार, असंघटीत कामगार यांचेकरीता पेन्शनचा कायदा करून प्रतिमाह रू. ५,०००/- देण्यात यावे. पावसामुळे ज्यांची घरे पडली त्यांना नविन घर बांधकामासाठी रु. २ लाख अनुदान देण्यात यावे. आरमोरी नगरपरिषद क्षेत्रात रोजगार हमी योजनेचे कामे त्वरीत सुरू करण्यात यावी. विज बिल विधेयक २०२२ व वनसंवर्धन नियम २०२२ रद्द करण्यात यावा.

या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, रयत शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, युवारंग सामाजिक संघटना, अखिल भारतीय किसान सभा, शेतमजुर युनियन (लालबावटा) यांचे संयुक्त विद्यमाने
दिनांक : ३०/०८/२०२२ रोज मंगळवारला दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालय आरमोरी समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे तरी बहुसंख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन कॉ. अमोल मारकवार, दिलीप घोडाम, .रंणजीत बनकर, श्री. निखील धार्मिक, प्रफूल खापरे, राहुल जुआरे, वृंदाताई गजभिये, मंजुषाताई बेदरे, यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post