दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर सुमोच्या धडकेत ४ गंभीर जखमी

 सावर्ला :- येथील अंकुश केवळराम बारसागडे वय ३० वर्ष हा कावीळ औषध घेण्यासाठी तळोधी बा. ला येत असताना तळोधी कडून भरधाव वेगाने बालापुरकडे जात असलेल्या सुमो वाहनाने गुरवारचे रात्री ९. वाजताच्या दरम्यान बोकोडोह नाल्या जवळील कबाडी दुकाना जवळ दुचाकीला धडक दिल्याने सावर्ला येथील सुधाकर वासुदेव सयाम वय ५० वर्ष व अंकुश केवळराम बारसागडे वय ३० रा. सावर्ला हे दोन्ही गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत अंकुश ने उपचारासाठी दवाखान्यात आणत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने सुधाकर वासुदेव सयाम वय ५० वर्ष मरण
पावले तर जखमी मध्ये, अंकुश नागभीड केवळराम बारसागडे, प्रकाश मनीराम नैताम वय ५२ रा. चंद्रपूर, ज्ञानेश्वर श्रीराम मडावी वय ४६ रा. मांगली अरब, व काशीनाथ रामदास पुराम वय ६३ रा. आकापुर असून तळोधी बा. येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.

मात्र जखमी ना सुध्दा डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी ब्रम्हपुरी किंवा चंद्रपूर नेण्यासाठी तयारी सुरु आहे.

तळोधी बा. पोलीस स्टेशन ठाणेदार शेंडे साहेब यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा करण्यात आले. मरण पावले असलेल्या सुधाकर वासुदेव सयाम यांचे शवविच्छेदनासाठी नागभीड ला नेण्यात आले. मात्र अज्ञात असलेले सुमो वाहन फरार झाले असून तळोधी पोलीस तपास करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post