अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केले शोषण....तर दुसरीशी थाटला संसार

सेलू :- तालुक्यातील एका पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाने लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीचे वारंवार शोषण केले. मात्र, पीडितेला न सांगताच त्याने दुसरीशी संसार थाटला. याबाबत मुलीने सेलू पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

स्वप्निल अरुण दावेदार (२५) रा. घोराड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वप्निल दावेदार हा मागील अनेक वर्षांपासून केला. एका पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. अडीच वर्षांपूर्वी त्याची ओळख एका मुलीशी झाली. स्वप्निल याने लग्नाचे आमिष देत मुलीला विश्वासात घेत २०२० पासून वारंवार तिचे शोषण केले. स्वप्निलने विश्वासघात करुन चार महिन्यांपूर्वी दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याची कुणकुण पीडितेला लागली. पीडितेने थेट सेलू पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी
स्वप्निल दावेदार याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला

घटना घडल्या पासून आरोपी स्वप्नील फरार झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या निर्देशनात गुन्हे शोध पथकाच्या चमूने रात्रीच्या सुमारास आरोपीस अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकातील अखिलेश गव्हाणे, नारायण वरठी, सचिन वाटखडे, कपिल मेश्राम आदींसह कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत. शोध घेऊन घेत स्वप्नील दावेदारला अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post