विद्या भवन शाळेच्या यशाबाबत मुख्याध्यापकांचा गुणगौरव


विरेंद्र म्हात्रे उपसंपादक 

 नवी मुंबई : सलग १९ वर्ष दहावीच्या विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल नेरूळ सेक्टर १८ मधील पुणे विद्या भवन शाळेतील मुख्याध्यापकांचा सत्कार व गुणगौरव भाजप प्रभाग क्रं ९६व ९७ च्या वतीने स्वातंत्र्यदिनी करण्यात आला.
पुणे विद्या भवन या शाळेचा दहावीचा सलग १९ वर्षे शंभर टक्के निकाल लागल्याने शिक्षण क्षेत्रात या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांवर प्रशंसेचा वर्षाव होत आहे. गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या मुख्याध्यापकांचा सत्कार व गुणगौरवाचे स्वातंत्र्यदिनी आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा व शाळा संस्थेच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे संस्थाचालक दिनेश मिसाळ, ज्युनिअर कॉलेजचे मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक राजेंद्र ढेंरगे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रीजा नायर, मराठीच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा मिसाळ, इंग्रजी विभागाच्या माध्यमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनिषा मुळीक, शाळेच्या पूर्व प्राथमिकच्या पर्यवेक्षिका श्रीमती अस्मिता सलगर यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. 
भाजपच्या वतीने नेरूळ मंडल अध्यक्ष राजू तिकोणे,माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत, अशोक गांडाळ, विकास तिकोणे, शशिकांत मोरे, संपत तोडकर हे सत्कार समारंभामध्ये सहभागी झाले होते. यानिमित्ताने शाळेच्या वतीने भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण शाळेच्या आवारात करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post