अखेर पोलिसाचा मृतदेह आढळला सती नदीत...

कुरखेडा : कोरची तालुक्यातील बेडगाव पोलीस मदत केंद्रात तैनात; पण काही दिवसांपासून प्रतिनुियक्तीवर जिल्हा पोलीस मुख्यालयात असलेल्या पोलीस शिपाई प्रताप सुंदरसिंग गावळे (३४ वर्ष), रा. अल्लीटोला यांचा मृतदेह पुराच्या पाण्यात आढळला.

पुराडानजीक सती नदीच्या पुरात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास गावळे यांचा मृतदेह दिसून आला. पण ते पाण्यात अपघाताने पडले की त्यांनी पाण्यात उडी घेतली हे स्पष्ट होऊ शकले नाही.


मृतक शिपाई प्रताप गावळे हे २८ जुलैपासून घरून निघून गेले होते.याबाबतची माहिती बेडगाव पोलीस मदत केंद्रात कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. गावळे हे काही दिवसांपासून आजारी व मानसिक तणावात होते. त्यातून ते घरी कोणतीही सूचना न देता निघून गेले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिल्याचे पुराडा पोलिसांनी सांगितले.

मानसिक तणावात जंगलात भटकंती करताना सती नदीच्या प्रवाहात सापडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा तपास पुराडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यांच्या मार्गदर्शनात हवालदार प्रल्हाद कोडाप करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post