प्रेयसीचं व्हॉट्सअॅप चॅटिंग पाहिलं, त्याचं डोकं फिरलं, भररस्त्यात तिला झोडपलं..

पुणे: दुसऱ्या मुलाशी बोलत असल्याचा संशयातून प्रियकराने २५ वर्षीय प्रेयसीला भररस्त्यात झोडपून काढल्याची घटना पुण्यात घडलीये. पुण्यातील मार्केट यार्ड येथील सार्वजनिक रिक्षा स्टॅण्डजवळ ८ ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या प्रियकराला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

तक्रारदार पीडित तरुणी सद्दाम करीम शेख याला भेटण्यासाठी गेली होती. ते दोघेही गप्पा मारत असताना आरोपीने या तरुणीचा मोबाईल काढून घेतला. तरुणीने तिच्या बहिणीसोबत केलेले चॅटिंग त्याने पाहिले. त्याला त्याची प्रेयसी दुसऱ्या तरूणासोबत बोलत असल्याचा संशय आला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. त्याने तिला भररस्त्यातच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने प्रेयसीला भररस्त्या शिवीगाळ करत मारहाण केली.त्यानंतर प्रेयसीने प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार
दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रियकराला
अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post