सख्ख्या चुलत भावांनी बहिणीवर सामूहिक बलात्कार करून आजीवरही केला बलात्कार

मध्य प्रदेश:-  नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जबलपूरमध्ये सख्ख्या चुलत भावांनी बहिणीवर सामूहिक बलात्कार करत तिची हत्या देखील केली आहे. हे दोघे इथेच थांबले नाहीत तर ही घटना जेव्हा पीडितेच्या आजीला समजली तेव्हा आजीने विरोध केला म्हणून आजीवर देखील दोघांनी बलात्कार केल्याचे समोर आलंय.

जबलपूरमधील रांझी परिसरात मुंबईमधील मुलगी तिच्या आजीला भेटण्यासाठी आली होती. त्यानंतर त्या भावांनी संधी साधत तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने विरोध करताच दोघांनी तिला अमानूष मारहाण केली. याच मारहाणीत त्या पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेचे वय 16 वर्ष होते. ही घटना पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या पथकासह गावी धाव घेतली


वडील गावी पोहोचण्याअगोदरच पीडितेचा मृतदेह पुरण्यात आला होता. परंतू वडिलांच्या तक्रारी नंतर तिचा मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला. आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटकदेखील केलीये. तर दुसरा आरोपी फरार आहे. आजीनेही तिच्यासोबत बलात्कार केल्याचा जबाब दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जबलपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रदीप कुमार शेंडे म्हणाले की, आम्ही तपास करत आहोत. लवकरच दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post