दारु पार्टीचे व्हिडिओ प्रकरणी सहाय्यक अभियंता जांभुळे यांना केले जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी निलंबित

जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांची कारवाई


गडचिरोली:- जिल्ह्यातील धानोरा येथिल जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता के. एच. जांभुळे यांनी केलेल्या दारु पार्टीचे व्हिडिओ व सिडी तयार करुन त्यांची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यात सहाय्यक अभियंता जांभुळे हे दोषी आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी त्यांना निलंबित केल असल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राजेश नाथानी यांच्या सह सात कंत्राटदारांनी दिनांक २४जुन २०२२ला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीत म्हटले होते की, सहाय्यक अभियंता के. एच. जांभुळे यांनी धानोरा तालुक्यातिल दुर्गापुर गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पळसगाव येथिल सिमेंट क्रांकिट केल्याचा रस्त्याच्या बांधकामावर रुबाब दाखवत दारु पाजण्याची मागणी केली. सोबतच पार्टीचे आयोजन करण्यात आले. संबंधित अभियंत्ता कामाचे बिल काढण्याकरिता टक्के ५ रक्कमेची मागणी करतो अशी देखिल तक्रार करण्यात आली होती.

सदर प्रकरणाबाबत चौकशी समिती नेमुन अधिक तपास केला असता असे निर्देशनास आलेकी सहाय्यक अभियंता जांभुळे यांनी कर्तव्यात कसुर महाराष्ट्र जि.प. जिल्हा सेवा वर्तणुक नियम १९६७ मधिल नियम ३चा भंग ठपका ठेवत जि.प. बांधकाम उपविभाग धानोराचे सहाय्यक अभियंता के. एच. जांभुळे यांना सेवेतुन निलंबित करन्यात आले. त्यानंतर त्याचे मुख्यालय जिप बांधकाम विभाग उपविभाग अहेरी पंचायत समिती ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post