हेटीतील ३२ लाखांचे गूढ आणखी गडद

 धानोरा : तालुक्यातील हेटी या गावात धानोरा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ज्या घरातून ३२ लाख ६२ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली त्याचे गूढ आणखीच वाढले आहे. घरमालक साईनाथ मंगरू कुमरे (५० वर्षे) यांचे बयान पोलिसांनी घेतले. पण ते संदिग्ध असून, त्या रकमेचा सोर्स किंवा ती रक्कम घरात कशासाठी ठेवली होती, अशा साध्या प्रश्नाचेही स्पष्ट उत्तर ते देऊ शकलेले नाहीत, असे असताना पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


वास्तविक ती रक्कम वैध मार्गाने आलेली असेल तर त्याबाबत घरमालकाने लगेच आपले स्पष्टीकरण दिले असते. याशिवाय एवढी रक्कम घरात कोणत्या कारणासाठी ठेवली हेसुद्धा त्यांनी लगेच सांगितले असते. परंतु तसे झाले नसल्यामुळे ती रक्कम अनधिकृत मार्गाने आलेली आहे, हे स्पष्ट होत आहे. तरीसुद्धा पोलीस आयकर विभागाच्या नावाखाली संबंधिताला पाठिशी तर घालत नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post