अन् दारुच्या नशेत झिंगलेल्या पोलिसाला नागरिकांनी चांगलेच चोपले...

भंडारा - पोलिस हवालदाराने बिअरबार मालकाशी वाद घातला. त्यानंतर जवळ असलेली तलवार काढून जीवे मारण्याची धमकी दिली. यात नागरिकांनी दारुच्या नशेत झिंगलेल्या पोलिसाला चांगलेच चोपले. ही घटना दि. २ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता भंडारा शहरातील शास्त्री चौकातील यश बार समोर घडली.

सुनील भोंगाळे (४१) रा. शुक्रवारी वॉर्ड, शिवाजी पुतळयासमोर भंडारा असे तलवार घेऊन धिंगाणा घालणाऱ्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. त्याच्याविरुध्द भंडारा पोलिस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे

जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील वरठी पोलिस ठाण्यात सुनील भोंगाळे हा पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी तो शास्त्री चौकातील यश बारमध्ये गेला होता. तिथे त्याने मद्यप्राशन दरम्यान त्याने बार मालक आणि तेथील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. वाद वाढला आणि तो विकोपाला गेला. यावेळी बार मालक सत्यपाल तुरकर यांनी त्याला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

वाद सुरु असताना मद्यधुंद पोलिस हवालदार सुनील हा बारच्या बाहेर आला तिथे त्याने स्वतःजवळ असलेली तलवार काढली. हातात तलवार घेऊन त्याने धुडगूस घातला. यावेळी त्याने तलवारीचा धाक दाखविण्याचा प्रयत्न करुन नागरिकांशी वाद घातला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी दारुच्या नशेत असलेल्या सुनीलला चांगलेच बदडले. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष बारसे हे आपल्या केले. पथकासह तातडीने घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी बार मालक सत्यपाल टेकचंद तुरकर रा. प्रगती कॉलनी, भंडारा यांच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसांनी सुनील विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी बेदम मारहाण केल्याने जखमी झालेल्या सुनीलवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात सरु आहे

Post a Comment

Previous Post Next Post