प्रेमसंबंधातून केला खून...

मध्य प्रदेश:- अत्यंत खळबळजनक घटना देशात उघडकीला आलेली असून एका तरुणाने आधी प्रेयसीची हत्या केली आणि त्यानंतर नदीत उडी घेऊन स्वतः देखील आपले आयुष्य संपवले. मध्यप्रदेशातील जबलपूर येथील ही घटना असून बारेला पोलीस ठाणे अंतर्गत भटोली इथे हा प्रकार उघडकीला आलेला आहे. नर्मदा पुलावर मुलीचा मृतदेह आढळून आला होता आणि त्यानंतर काही तासातच फरार झालेला पत्रकार बादल पटेल याचा देखील मृतदेह आढळून आला

शनिवारी संध्याकाळी नर्मदा पुलावर एका मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. छातीत गोळी लागल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी असलेल्या कारमध्ये एक माइक, आयडी आणि बादल पटेल याचे आधारकार्ड देखील सापडले होते त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला मात्र त्यानेदेखील नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिलेला आहे.

पोलीस तपासात बादल पटेल आणि मयत तरुणी अनिभा केवट यांच्यात अनैतिक संबंध होते मात्र काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाले. बादल हा विवाहित होता मात्र तरीदेखील अनिभा केवट हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याने त्यांच्यात वाद होत होते मात्र त्यांच्यातील प्रेम संबंधात दुरावा आला अन याच दरम्यान अनिभा केवट हिचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत प्रेम संबंध सुरू झाले त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाले.

शनिवारी बादल याने त्याचा मित्र असलेला विजय लाल याची स्विफ्ट गाडी घेऊन अनिभा केवट हिला तिच्या कार्यालयातून घेतले आणि तिला घेऊन भटोली इथे पोहोचला त्यानंतर त्याने कारमध्ये प्रेयसीला गोळ्या घातल्या आणि कारच्या चाव्या मागील सीटवर तसेच मोबाईल कारमध्ये ठेवून नर्मदा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post