अबब! गट्टा जि. प. शाळेचे शिक्षक करतात रोटेशन पद्धतीने ड्यूटी

एटापल्ली:-  तालुक्याच्या पेसा क्षेत्रातील गट्टा येथील उच्च प्राथमिक शाळा २७ व २८ जुलै रोजी पूर्णतः बंद होती. शाळा दोन दिवस बंद असल्याने शनिवारी सकाळी आठ वाजता गावकऱ्यांनी शाळेला भेट दिली. यावेळी सहा शिक्षकांपैकी एकच शिक्षक हजर होते. याबाबत शाळा बंदची तक्रार गट्टा येथील नागरिकांनी थेट गडचिरोली येथे पोहोचून मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शीवाद यांच्याकडे केली. गट्टा शाळेच्या गैरहजर शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. निवेदनात म्हटले आहे की, शाळेमध्ये कार्यरत ६ शिक्षकांपैकी मुख्याध्यापकासह ४ शिक्षक दुसऱ्या गावातून अप-डाऊन करतात. 

रोटेशन पद्धतीने रोज दोन शिक्षक अशी ड्यूटी करतात. अशा कामचुकार शिक्षकांसह व मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच तेथील सहाही शिक्षकांची बदली करून त्यांच्या जागेवर तीन शिक्षिकांसह इतर शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. शाळा बंद असताना या प्रकाराकडे गटशिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच केंद्रप्रमुख बदलविण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post