दारू पिऊन शिक्षिका ‘ तर्राट ‘ होऊन आल्या अन खुर्चीत कोसळल्या , विद्यार्थी म्हणतात की...

छत्तीसगड:- शाळा म्हटलं की शिक्षक आणि बेंचवर बसलेले विद्यार्थी हे चित्र समोर राहते उभे राहते मात्र जर शिकविणाऱ्या शिक्षिका याच दारू पिऊन वर्गात आल्या तर याची कल्पनाही करवत नाही मात्र असाच एक प्रकार छत्तीसगड इथे समोर आलेला असून एक शिक्षणाधिकारी शाळेची तपासणी करण्यासाठी आलेले असताना शिक्षिका दारू पिऊन खुर्चीत पडून होत्या. दारूच्या नशेत धूत झालेल्या या शिक्षिकेला शिक्षणाधिकारी आल्याची देखील जाणीव नव्हती त्यामुळे त्या जागेवरून देखील उठल्या नाहीत. मुलांनी देखील शिक्षणाधिकारी यांना आमच्या शिक्षिका दारू पिऊन धडपडत वर्गात आल्या आणि पडल्या असे सांगितल्याने शिक्षण अधिकारी देखील चकित झाले.

छत्तीसगड येथील जशपूर प्राथमिक शाळेतील ही घटना असून दारू पिऊन तर्राट झालेल्या या शिक्षिका खुर्चीतच पडून होत्या. अति मद्यपान केल्याने त्यांची शुद्ध हरपली आणि बेशुद्ध अवस्थेत त्या खाली पडल्या मात्र विद्यार्थ्यांनी त्यांना उचलून खुर्चीत बसवले होते मात्र याच वेळी शिक्षणाधिकारी शाळेची पाहणी करण्यासाठी आले याचे या शिक्षिकेला भानही नव्हते. अधिकाऱ्यांनी त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. त्यांनी सदर प्रकरणी वरिष्ठांकडे अहवाल पाठवलेला असून या शिक्षिकेवर आता काय कारवाई होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

शिक्षिकेला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रतिभा पांडे यांना फोन केला आणि या शिक्षिकेची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर दोन महिला कॉन्स्टेबल तिथे दाखल झाल्या आणि त्यांनी पोलिसाच्या वाहनातून अखेर या शिक्षिकेला रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांनी दारुचे सेवन केल्याचे लक्षात आले आता त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांशी चर्चा करताना विद्यार्थ्यांनी शिक्षिका या नेहमीच अशा पद्धतीने दारू पिऊन वर्गात येतात अशी तक्रार केली आहे. रोज दारू पिऊन वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्यांना देखील त्या मारझोड करतात आणि घरी काही सांगाल तर खबरदार अशी धमकी देखील देतात त्यामुळे विद्यार्थी आतापर्यंत गप्प होते . शाळा सुधार समितीने त्यांना अनेकदा सुधारण्याची संधी दिली होती मात्र त्यांच्यात बदल झाला नाही. जगपती भगत असे या शिक्षिकेचे नाव असल्याचे समजते.



Post a Comment

Previous Post Next Post