शहर पोलीस ठाण्यात दारूड्यांचा धिंगाणा

दहा जणांवर गुन्हा दाखल 


गोंदिया : मारबतच्या दिवशी दारूच्या नशेत असलेल्या दारूड्यांनी शहर पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला. एवढेच नव्हे तर डायरीवरील पोलिसाला ठार मारण्याची धमकी दिली.

रविवारी सकाळी ५.३८ वाजता पोलीस शिपाई सुमित भास्कर जांगळे (३४, बक्कल नंबर २१४४) हे डायरीवर असताना दहा आरोपी पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीजवळ मद्याच्या धुंदीत
जोरजोरात ओरडत होते.

शासकीय काम करू न देता सुमित यांना तू बाहर मिल तुझे बताते है असे बोलून मारपिट करण्याची त्यांनी धमकी दिली. शहर पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम १८६, १८९, १४३, १४६, १४७, १४९, ५०४, ५०६, सहकलम ११०, ११२, ११७ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद केला तपास पोलीस उपनिरीक्षक शरद सैंदाणे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post