भरधाव दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन तीन जण गंभीर जखमी....

कोरची :- तालुका मुख्यालयापासून 3 किमी अंतरावर असलेल्या मोहगाव-कोसमी रस्त्यावर काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. रामेश्वर रोहित रावते (२३) रु. राजनादगाव (छत्तीसगड), अजय वायके (22) रु. (छत्तीसगड) आणि रुपेश ढेक (25) यांना रु. मोहगाव ता. कोरची असे जखमीचे नाव आहे. केले गेले आहे.

प्राप्त माहितीनुसार रामेश्वर रोहित रावटे आणि अजय विके हे दोघेही मोटारसायकलने कुरखेडा मार्गाने छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथे सायंकाळी स्वतःच्या आईसाठी औषधी घेऊन वापस येत होते.

मोहगांव ते कोसमी जवळ मोहगांव येथील रुपेश ढेक याच्या मोटरसायकलशी समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये तिघेहीजण गंभीर जखमी झाले अपघात झाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ क्र ची रूग्णवाहीका बोलावली व कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले डॉ. राऊत, डॉ. यादव, डॉ. उईके , भगत यांनी जखमींवर प्रथमोपचार केला

जखमींच्या डोक्याला, हाताला व पायाला सुध्दा जबर मार लागलेला होता. कोरची येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post