आरमोरी बर्डी परिसरातील वडसा हाईवे वर गतिरोधक उभारा : मनसेतर्फे शेषराज सोनकुसरे यांची मागणी

आरमोरी (वा.) तालुक्यातील लोकांची सदैव वर्दळ असणाऱ्या व गावातील लोकांच्या नियमित येजा करण्याने बर्डी परिसरातील वडसा हाईवे रस्ता ओलांडताना लोकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मार्गावर विद्यार्थी, पुरुष वर्ग, महिलावर्ग सुसाट वेगाने गाड्या चालवत असल्यामुळे एक्सीडेंट चे प्रमाण वाढलेले आहे तरीही या रोड वर शाळा, कॉलेज, पेट्रोलपंप, तहसील कार्यालय, इतर शासकीय कार्यालय, दुकाने असल्याने गर्दी असतेच, म्हणून तत्काळ गतिरोधक लावण्यात यावे ही मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे. सदर रोडवर एकही गतिरोधक नाही त्यामुळे टू व्हीलर, फोर व्हीलर, व इतरही गाड्या भरधाव वेगाने येतात त्यामुळे एक्सीडेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
. सदर रस्ता ओलांडताना गावातील लोकांच्या मनामध्ये धडकी भरली आहे. त्यामुळे येथील मुख्य रस्त्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी आहे.

आरमोरी तालुक्याचे ठिकाण असल्याने, तालुक्यातील अनेक लोक ये-जा करीत असतात. वर्दळीचे गाव असलेल्या आरमोरी येथे बायपास रोड नसल्यामुळे गावातून जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांना तसेच स्थानिक वाहनधारकांना रस्ता ओलांडताना धोका पत्करावा लागतो. काही वाहनचालक वाहन सुसाट चालवत असल्याने येथे किरकोळ अपघात घडले आहेत. भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेगावर मर्यादा आणण्यासाठी येथील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष शेषराज सोनकुसरे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post