पेंढरीत परीसरात इंटरनेट सुविधेचा अभाव,बी,एस,एन,एल कवरेजचा लंपडाव,

 प्रतिनिधी पेंढरीः प्रशांत पेदापल्लीवार मो. ९४०५३५६०७० 


 पेंढरी:- धानोरा तालुक्यातील पेंढरी परीसरात बी,एस,एन,एल जीओ कंपनीचे टाॅवर उभारले आहेत.मात्र ,अध्यापही जीओ चे टाॅवर सुरु करण्यास कंपनिला मुहूर्त सापडत नसल्याने हे टाॅवर शोभेची वस्तु बनली आहे. या परीसरात बी,एस,एन,एल नेटर्वक उपलब्ध आहे मात्र ,कुणाशी संपर्क केल्यास वांरवार रिडायल करुन सुध्दा फोन लागत नाही. वारंवार सेवेचा लपंडाव पन चालु असतो अशी अवस्था झालेली आहे. तसेच इंटरनेट सुविधेचा पूर्णतः अभाव आहे.त्यामुळे इंटरनेट सुविधेसाठी ग्राहक जीओ कडे मोठ्या आशेने पाहत आहेत.परंतु (३)तीन वर्ष लोटुनही अजुन पर्यंत जीओची जोडणी झालेली नाही, पेंढरी परीसरात इंटनेटचा अभाव आहे.त्यामुळे परिसरातील ग्राहक ऑंनलाईन गोस्टीबद्दल सुध्दा अनभिज्ञ आहेत.याचा परीणाम परीसरातील नागरीकांना होत आहे.आजकाल सर्व कार्यालयीन खाजगी व शासकीय कामे ऑंनलाईन पध्दतीने झाले आहेत. परंतु परीसरात इंटरनेट सुविधा नसल्यामुळे लोंकाना सरळ तालुका किंवा जिल्हा गाठावे लागत आहे.त्यामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावे लागत आहे.संबधित विभागाने लक्ष घालुन सेवा सुरळीत करण्याची मागणी परीसरातील नागरीकाकडुन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post