पी.आर.डी. स्पोर्ट्स ,ब्रह्मपुरी तर्फे प्रतापगड येथे ट्रेकिंग चे आयोजन व वृक्षारोपण.*

ब्रह्मपुरी :- ब्रह्मपुरी शहरात मागील ५ वर्षापासून क्रीडा क्षेत्रात अनेक उत्कृष्ट खेळाडू निर्माण करणाऱ्या पी.आर.डी. स्पोर्ट्स ,ब्रह्मपुरी तर्फे मुलांच्या मानसिक विकासासोबत मुलांचा शारीरिक विकास व्हावा या उद्देशाने मागील ५ वर्षांपासून नियमित व्यायाम शिकविले जातात आजच्या संगणक युगात मोबाईल मध्ये गुंतत चाललेल्या चिमुकल्यांना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन प्रत्यक्ष निसर्गाचे रूप अनुभवण्यासाठी पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी तर्फे ट्रेकिंग चे आयोजन आज दि.२१ ऑगस्ट २०२२ ला गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वनराईने नटलेला प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रतापगड येथे करण्यात आले या ट्रेकिंग मध्ये वय ८ वर्ष ते २६ वर्षाच्या ४० मुला मुलींनी सहभाग घेतला या ट्रेकिंग कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींची ओळख व त्यांचे महत्त्व समजून सांगण्यात आले याप्रसंगी वनस्पती विशेषतज्ञ मा.चारुदत्त राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरी चे संचालक राहुल जुआरे, सहप्रशिक्षक मनोज गेडाम ,शुभम सुरपाम उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post