तरुणाला नागाच्या जोडीने ऐकून 28 वेळा दंश केला तरीही...

छतरपूर:-;एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जे ऐकून अनेकांनाचा धक्का बसला आहे. बऱ्याचदा तुम्ही सापाने चावल्याचा प्रकार ऐकला असेल. ज्यामध्ये काहींचा मृत्यू झाला आहेत, तर अनेकांना वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्यांचे प्राण देखील वाचले आहेत.
परंतू आता समोर आलेलं प्रकरण काही वेगळं आहे. कारण येथे एका तरुणाला नागाच्या जोडीने ऐकून 28 वेळा दंश केला आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे. इतक्या वेळा दंश करुन देखील तरुणाचे प्राण वाचले आहेत. या तरुणाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी देखील याची पुष्टी दिली आहे.

त्यांनी सांगितल्यानुसार, प्रत्येक वेळी नाग किंवा नागिन दोघांपैकी कोणीतरी एक यायचं आणि आमच्या दिनेशला दंश करुन जायचे. ज्यामुळे आम्हाला आमच्या मुलाला रुग्णालयात दाखल करावं लागायचं, नशीबाने आमच्या मुलाचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत 28 वेळा या नाग आणि नागीनीच्या जोड्याने आमच्या मुलाला दंश केला.
अखेर, नागाच्या जोडीचा असा प्रकार थांबवण्यासाठी कोणीतरी त्या तरुणाला छातीवर नागाचा टॅटू काढण्यासाठी सांगितला. ज्यानंतर नागाच्या जोडीपासून वाचण्यासाठी या तरुणाने टॅटू काढून घेतला. ज्यानंतर अचानक या नागाच्या जोडीने तरुणावर हल्ला करणं थांबवलं आहे. या प्रकरणाची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे.

कुटुंबासोबतच गावातील लोकांनाही समजू शकले नाही की नाग-नागिन जोडी तरुणाच्या मागे का आहे? कुटुंबीयांनी दिनेशला सापांसाठी बनवलेल्या धार्मिक स्थळांवर आणले असता, त्यांच्या अंगावर सापाचे टॅटू काढण्यास सांगितले. टॅटू काढल्यानंतर आता तरुणाला दिलासा मिळाला आहे. आता गेल्या काही दिवसांपासून त्याला एकही साप चावला नाही.
छतरपूर जिल्ह्यातील चांदला नगर पंचायत परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय दिनेश नामदेवसोबत ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या एका वर्षात त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. दिनेशच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी खेळता खेळता त्याने झाडाखालील काही दगड उचलले.

यानंतर त्याला दिसले की नाग-नागिनची जोडी तेथे होती, ज्यांनी त्याचा पाठलाग केला. भितीपोटी दिनेश घरी पळत सुटला पण घराजवळ आल्यावर काळ्या सापाने चावा घेतला. नातेवाइकांनी तत्काळ दिनेशला डॉक्टरांकडे नेले आणि उपचारानंतर त्याचे प्राण वाचले. आता दिनेश दावा करत आहे की नाग-नागिन जोडीने त्याला आतापर्यंत 28 वेळा चावा घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post