मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक दुबऀलतेमुळे होतात आत्महत्या. 🔹 मेंदूतील बायो- न्यूरॉलॉजीकल बदलामुळे जिवन निरर्थक वाटते

🔹आत्महत्येंच्या घटनांचे स्वार्थासाठी करतात राजकीय भांडवल.? 

🔹 मदत न करता प्रसिद्धीसाठी करतात खोटे आरोप. 

नागपूर / चक्रधर मेश्राम दि. 17 सप्टेंबर 2022:-

जगभरात दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. आणि त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. आत्महत्या करण्याचा विचार येणं हे शारीरिक, बौद्धिक, मानसिक आजाराचे लक्षण आहे. 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 15 ते 19 वर्ष या किशोरवयीन वयोगटात आत्महत्या हे मृत्यूचं चौथ्या क्रमांकाचं प्रमुख कारण आहे.
आत्महत्येमागे नैराश्य, असुरक्षितता, जीवनाबद्दल नकारात्मकता, असहाय्यता, मानसिक असंतुलन शारीरिक दुबऀलता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना असते. वैद्यकीय कारणही असतात. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणजेच Suicide Prevention Day च्या निमित्ताने, आत्महत्येबाबत सामान्यांना पडणारे प्रश्न आणि आत्महत्येचा विचार मनात आलेल्यांशी कसं बोलावं हे जाणून घेणे महत्वाचे आहे. लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार का येतो. एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं किंवा त्याने आत्महत्येची कल्पना करणं, याला मानसोपचारतज्ज्ञ 'सुसाइट आयडिएशन' म्हणतात. म्हणून प्रत्येकांनी 
मानसिक आरोग्याबद्दल जागरूक असले पाहिजे. 
मनात आत्महत्येची कल्पना येण्यास एकच कारणं कारणीभूत नसतं. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याआधी घडलेली घटना निमित्तमात्र असू शकते. त्याक्षणी, जीवन संपवणं हा एकच मार्ग त्या व्यक्तीला दिसतो, असं तज्ज्ञ म्हणतात.
दिलशाद खुराना Mpower या मानसिक आरोग्याशी संबंधित हेल्पलाईनच्या प्रमुख मानसशास्त्रज्ञ आहेत. त्या म्हणतात, "माझ्या जीवनात काहीच उरलेलं नाही. आयुष्य संपवणं हा एकच मार्ग आहे. लोकांच्या मनात येणाऱ्या या विचारांना 'सुसाइट आयडिएशन' म्हणतात."
नैराश्याचं शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या असा सर्वसाधारण समज आहे. याचं कारण डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. यामागे वैद्यकीय कारणंही आहेत . 
मानोविकारतज्ज्ञ डॉ. अंबरीश धर्माधिकारी सांगतात, "आत्महत्येचा विचार नैसर्गिक नसतो. मेंदूतील बायो- न्यूरॉलॉजीकल बदलामुळे लोकांना जीवन व्यर्थ वाटू लागतं. त्यामुळे, आत्महत्येचे विचार येतात. आत्महत्येच्या 90 टक्के प्रकरणात मानसिक असंतुलन, शारीरिक दुबऀलता, बौद्धिक आजार प्रमुख कारण आहे."



डिप्रेशन किंवा नैराश्यात असलेले लोक जगाकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पहातात. जणू त्यांनी नकारात्मक विचारांचा चष्मा घातलेला असतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार
डिप्रेशन किंवा नैराश्य
मानसिक स्थितीत चढ-उतार
सतत चिंता किंवा अस्वस्थता, सतत मनात नकारात्मक विचार भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना , मानसिक, शारीरिक बौद्धिक आजारानेग्रस्त व्यक्ती आत्महत्या करण्याचा विचार करतो. 
 नेहमी सतत निराशावादी बोलणं, मृत्यूची भाषा करणं, ही काही आजाराची लक्षणं आहेत. एखाद्याच्या आयुष्यातल्या या बदलांकडे कुटुंबातील लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे.डॉ. धर्माधिकारी म्हणतात की "आत्महत्येचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत वॉर्निंग साईन (धोक्याची सूचना) असतातच असं नाही. पण बऱ्याचदा लोक त्यांच्या भाषेतून किंवा कृतीतून अशा साईन्स देत असतात."
तुम्ही काय खाताय यावर तुमचं मानसिक शारीरिक आणि बौद्धिक आरोग्य अवलंबून असते. 
नकारात्मक विचार प्रत्येकाच्या डोक्यात येतात. काहीवेळा मनात येणारा विचार काही क्षणांचा असतो. तर, काही लोकांमध्ये हळूहळू नकारात्मकता वाढत जाऊन हे विचार वाढतात. मानसिक आजारांबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे लोक मोकळेपणाने बोलणं टाळतात. अशावेळी मानसिक आरोग्याबाबत समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईन महत्त्वाची भूमिका बजावतात.
मुंबईच्या केईएम रुग्णालयातर्फे मानसिक आरोग्यावर समुपदेशनासाठी 'हितगुज' हेल्पलाईन कार्यरत आहे. विभागप्रमुख डॉ. अजिता नायक म्हणतात, "सुसाईड प्रतिबंध हेल्पलाईन रुग्णांशी संपर्काचा पहिला टप्पा असतो. आत्महत्येचा विचार मनात आल्यानंतर, थेट मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं शक्य नाही. अशावेळी या हेल्पलाईनवर संपर्क केल्यामुळे मदत मिळू शकते." मनात आत्महत्येचा विचार आल्यास मानसिक आरोग्यासंबंधी समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईनला संपर्क करा किंवा शक्य असेल तर समुपदेशक किंवा डॉक्टरांना भेटा.
आत्महत्येचा विचार का येतो, हा किती गंभीर आहे याचं निदान महत्त्वाचं आहे. "आत्महत्येचा विचार येताक्षणी मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती स्वत:साठीच धोका असतो. ते स्वत:लाच हानी पोहोचू शकतात. त्यामुळे तात्काळ योग्य उपचार महत्त्वाचे आहेत."मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीला कुटुंबाची साथ सर्वांत जास्त महत्त्वाची असते. कुटुंबियांनी आणि सामान्यांनी विचार न करता माहित नसलेला चुकीचा सल्ला देऊ नये. 





 कॅज्युअल सल्ले देऊ नयेत. आत्महत्येच्या विचारांबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजूती आहेत. सामान्यांचा गैरसमज आहे की, विचार किंवा परिस्थिती गंभीर होईपर्यंत लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार येत नाही. असे अनेक गैरसमज आहेत. 
"आत्महत्येचा विचार मनामध्ये केव्हाही येऊ शकतो." आत्महत्येचा विचार फक्त लक्ष वेधण्यासाठी असतो.आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग आहेत. असे डॉ. अंबरीश धर्माधिकारी म्हणाले. 
आत्महत्येच्या विचारातून बाहेर येण्यासाठी सुसाइड हेल्पलाईनची मदत, समुपदेशन, सकारात्मक विचार आणि वैद्यकीय मदत घेऊन आपले जीवन चांगले करता येते. "आत्महत्येचे सातत्याने विचार येत असलेल्या गंभीर प्रकरणात इलेक्ट्रोकन्वल्सिव्ह (ECT) थेरपी अत्यंत उपयुक्त आहे. याला सामान्य भाषेत शॉक थेरपी म्हणतात. पण, यात शॉक दिला जात नाही. यात रिकव्हरी खूप फास्ट होते."
थॉट मॉडिफिकेशन, चिडचिडेपणा कमी करण्याच्या टेक्निकचा तिला फायदा होतो. त्या सांगतात, "तुम्ही तुमचे जर विचार कोणाला सांगू शकत नाहीत. तर, लिहून काढा. जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू शकता."
प्रसिद्ध आणि चर्चित व्यक्तीने आत्महत्या केली. तर आत्महत्येच्या विचारांबाबत हेल्पलाईनवर व्यक्त होणारे कॉल्स अचानक वाढतात. "प्रसिद्ध व्यक्तीने आत्महत्या केली. तर, लोकांना आपणही वैद्यकीय मदत घेतली पाहिजे याची जाणीव होते. त्यामुळे, जेव्हा मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होते. लोक मदतीसाठी फोन करतात."बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर केईएम रुग्णालयाच्या हितगुज हेल्पलाईनवर येणारे कॉल्स चार-पाट पटीने वाढले होते.





हितगुजच्या समुपदेशक संगीता राव (नाव बदललेलं) सांगतात, "सुशांतच्या आत्महत्ये नंतर 15 दिवस खूप फोन आले. तो यशस्वी होता तरी त्यांनी आत्महत्या केली? अपयश इतका परिणाम करतं? असा लोकांचा प्रश्न होता." सामान्यत: आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरूषांचं प्रमाण जास्त आहे. पण, कोरोना संसर्गाच्या काळात आत्महत्येचा विचार करणाऱ्यांमध्ये पुरूषांची संख्या जास्त आहे. तर, कौटुंबिक संबंधात स्त्रियांमध्ये आत्महत्येच्या विचारांचं प्रमाण जास्त आहे. अलिकडे सर्वत्रच आत्महत्येचे प्रमाण वाढले असून त्यामागची कारणीभूत परिस्थितीचा विचार न करता राजकीय पक्ष निवडणूक आणि प्रसिद्धीसाठी भांडवल उभे करतात. असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. खोटे दोषारोप ठेवीत असतांना सामाजिक जबाबदारीची जाणिव, कर्तव्य याचा विचार केला पाहिजे.

असे कुठलेही मानसिक आजाराचे लक्षण आढळले तर त्वरित मानसिक विकार तज्ञ डॉक्टर कडे संपर्क साधावा.

खालील वैशिष्ट्ये मानसिक विकार दर्शवितात:
विलक्षण तीव्र भावना
झोपेच्या नमुन्यांमध्ये आणि क्रियाकलाप पातळीमध्ये बदल
असामान्य वागणूक
सतत दुःखी किंवा चिंताग्रस्त मनाची भावना
निराशाची भावना
चिडचिडपणा
अपराधीपणा, असहाय्यपणा किंवा निष्काळजीपणाची भावना
क्रियाकलाप आणि छंदांमध्ये स्वारस्य किंवा आनंद गमावणे
कमी ऊर्जा किंवा थकवा
बोलणे किंवा हळू हळू चालणे
डोकेदुखी
वरिगो
मळमळ
अपच
कोरडे तोंड
धाप लागणे
वारंवार मूत्रविसर्जन
मूत्र तत्काळ

मन म्हणजे मेंदू. भावनिक आणि बौद्धिक कार्य करणारा हा शरीराचा अवयव आहे. मेंदूचे काम बिघडल्यावर भावनिक किंवा बौद्धिक पातळीवर दिसणाऱ्या लक्षणांना आपण मानसिक आजार म्हणतो. मानसिक आजाराचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मेंदूत होणारे सूक्ष्म बदल. हे बदल साधारणपणे तपासणीत दिसून येत नाहीत. यासाठी मेंदूचे काम दर्शवणारी, रक्तपुरवठा दाखवणारी किंवा पेशींमधील विशिष्ट बदल दिसणाऱ्या तपासण्या कराव्या लागतात. पण या तपासण्या संशोधनासाठीच वापरल्या जातात. कारण आजाराचे स्वरूप बहुतेक वेळा त्याच्या लक्षणावरून समजून येते आणि शिवाय या तपासण्या खूप महागडय़ा असतात. शरीराची रचना ठरवणारी जनुके प्रत्येक पेशीत असतात. ही जनुके आई-वडिलांकडून मिळतात आणि शिवाय गर्भावस्थेत त्यात काही बदल होतात. सर्व मानसिक आजारांमध्ये जीन्समधील दोष हे कारण असते. पण हे आनुवंशिकच असले पाहिजे असे काही नाही. कारण व्यक्तीच्या जीनमध्ये आपोआपही बदल होऊ शकतात. जनुके जन्मापासून शरीरात असले तरीही मानसिक आजार जन्मानंतर बऱ्याच काळांनी होतात याचे कारण आजुबाजूला घडणाऱ्या घटना आणि आयुष्यात येणारे आव्हानात्मक प्रसंग.

मानसिक आजारांमध्ये अतिनैराश्याचे प्रमाण सर्वात जास्त असते. अतिनैराश्याचे दोन प्रकार असतात- एक युनिपोलर म्हणजे फक्त नैराश्याची लक्षणे असणारा आणि दुसरा बायपोलर म्हणजे नैराश्य आणि अतीव आनंदाची लक्षणे असणारा. या दोन आजारांत बायपोलरमध्ये जीनमधील बदल जास्त प्रमाणात आढळतो. मेंदू आणि शरीराचे आजार, मेंदूला इजा होणे, विषारी- अमली पदार्थाचे सेवन आणि आयुष्यातील ताण-तणाव यांमुळे कुठलाही मानसिक आजार उद्भवू शकतो किंवा वाढू शकतो. पण अतिनैराश्य येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. स्क्रिझोफेनिया, अतिसंशय (ओब्सेसिव कॅम्पल्सिव डिसॉर्डर), घाबरटपणा या आजारांमध्ये जनुकांमधील बदल जास्त महत्त्वाचे ठरतात. आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीमध्ये आनुवंशिकतेचा जास्त वाटा असतो.

स्क्रिझोफेनियामध्ये जनुकांमधील बदल आनुवंशिक असू शकतात किंवा गर्भवती मातेला फ्लू झाल्यास किंवा ती कुपोषित असल्यास भ्रूणावस्थेतील मुलाला स्क्रिझोफेनिया होण्याची शक्यता असते. पाश्चात्त्य देशात गरोदर महिलांची नीट काळजी घेतल्यामुळे स्क्रिझोफेनियाचे प्रमाण कमी झालेले आढळून आले आहे. ज्या महिलांमध्ये अतिसंशयाचे जीन असते, ते इतर वेळेला सुप्तावस्थेत राहते. मात्र अनेकदा गर्भारपणातील हार्मोनमधील बदलांमुळे लक्षणे दिसू लागतात आणि आजार सुरू होतो. अति अस्वस्थपणा (किंवा घाबरटपणा) साठीही बहुतेकदा शरीरातील जीन कारणीभूत ठरतात. लहानपणी अति रागावणे-घाबरवणे अथवा त्याउलट अति सांभाळणे, कुठल्याही प्रकारचे शोषण, मोठे अपघात यांमुळेही घाबरटपणा वाढीस लागतो.


मानसिक आजाराची लक्षणे, मानसिक आजार उपाय 

मानसिक आजारावर घरगुती उपाय
सध्याच्या धावपळीच्या जगण्यात मानसिक आजाराची लक्षणे, मानसिक आजार उपाय मराठीत हे वरचेवर ऐकायला मिळणारे विषय झाले आहेत. पण मानसिक आजार म्हणजे नक्की काय आणि हा आजार का आणि कसा होतो. हा आजार आपल्याला झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं याबद्दल अजूनही जागरूकता नाही. बरेच लोक आपल्याला मानसिक आजार आहे हे स्वीकारायलाच तयार होत नाहीत. पण खरं तर मानसिक आजार हा असा आजार आहे जो तुम्ही वेळेवर स्वीकारलात तर तुम्ही त्यावर उपचार करून तुमचं पुढचं आयुष्य अतिशय चांगल्या रितीने जगू शकाल. अगदी तुम्ही बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटीजच पाहिलंत तरी बरेच सेलिब्रिटी या गोष्टीसाठी पुढे येत आहेत. दीपिका पादुकोणसारख्या अभिनेत्रीनेही याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी बरीच पावलं उचलली आहेत. ती स्वतः या आजारातून बाहेर आली आहे. पण याबद्दल बोलून त्यावर पाऊल उचलणं हाच एक योग्य तोडगा आहे. त्यामुळे तुम्हाला जर अशी लक्षणं दिसत असतील आणि तुमच्यामध्ये काही बदल लोकांनाही जाणवत असतील तर तुम्ही वेळेवर स्वतःकडे लक्ष द्यायला हवं.


सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक आजार नक्की काय असतो? मेंदूचं काम जेव्हा बिघडतं तेव्हा भावनिक आणि बौद्धिक पातळीवर परिणाम होत असतो. या परिणामालाच मानसिक आजार असं म्हटलं जातं. मेंदूमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांमुळे मानसिक आजार होतो. सहसा हे सुरुवातीला दिसून येत नाही. पण त्यासाठी मेंदूचं काम दर्शवण्यासाठी आणि रक्तपुरवठा दाखवणाऱ्या आणि पेशींमध्ये विशिष्ट बदल असणाऱ्या तपासण्या कराव्या लागतात. आजाराचं कारण कळतं कशावरून ते म्हणजे लक्षणांवरूनच. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा याची नक्की लक्षणं काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे.


मानसिक आजार लक्षणे (Mansik Aajar Lakshan)
मानसिक आजार आपल्याला आहे किंवा अन्य कोणालाही हा आजार असल्याची शक्यता आहे हे सांगण्यासाठी काही लक्षणं दिसून येतात. त्यापैकी काय महत्त्वाची लक्षणं आहेत ते जाणून घेऊ –

अचानक रडू येणं
दुखः वाटणं अथवा रिकामेपणाची भावना सतत वाटणं
झोप न लागणं अथवा अधिक झोप लावणं
सतत थकल्यासारखं वाटणं
पचन नीट न होणं
आत्महत्येचे सतत विचार येणं
आशावादाचा अभाव
सतत अस्वस्थता वाटणं
एकलकोंडेपणा
मानसिक आजाराचे प्रकार (Types Of Mental Illness In Marathi)
मानसिक आजाराचेही अनेक प्रकार आहेत. खरं तर मानसिक आजार उद्भवण्याची कारणं अनेक असतात. प्रत्येक व्यक्तीसाठी ती निरनिराळी असतात. पण मानसिक आजाराचेही प्रकार असतात. ते आपण जाणून घेऊ. नक्की या प्रकारांमध्ये काय काय घडतं हे प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. जाणून घेऊया नक्की मानसिक आजार कोणते –

मानसिक आजाराचे प्रकार
1. अस्वस्थता
अस्वस्थता अर्थात डिप्रेशन हा शब्द नेहमीच आपल्या कानावर येत असतो. पण नक्की डिप्रेशन येणं म्हणजे काय याची चर्चा मात्र होत नाही. तर सतत करिअर, पैसा आणि जीवनातील आपली परिस्थिती याबद्दल विचार करत राहणं, निद्रानाश होणं, सतत डोकं दुखत राहणं, चक्कर येणं अशी लक्षणं सतत दिसायला लागल्यावर तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं घडत आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. बऱ्याचदा अतिविचाराने हा आजार उद्भवतो. पण त्यावरचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे व्यवस्थित झोप येणं. कारण जितका जास्त विचार करून तितकी तुमची झोप उडते आणि त्यामुळे डोकेदुखी आणि अंगदुखी उद्भवते त्यामुळे ही एक साखळीच आहे. यावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नक्की काय विचार करत आहात हे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर शेअर करणं गरजेचं आहे. मग ती कोणीतही तुम्हाला समजून घेणारी व्यक्ती हवी. डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातील ताण आणि असह्य होणाऱ्या गोष्टी नेहमीच बाहेर काढून टाकणं गरेजचं आहे. तर तुम्ही या मानसिक आजारातून बरे होऊ शकता अन्यथा तुम्ही अधिकाधिक यामध्ये गुंतत जाऊन स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ शकता. वेळेवर आपल्याला नक्की काय होत आहे याचा अंदाज घेत डॉक्टरांची अथवा आपल्या जवळच्या माणसांची मदत घेण्याची गरज आहे.

2. स्क्रिझोफ्रेनिया
स्क्रिझोफ्रेनियाची लक्षणं ही व्यक्तीनुसार बदलतात. किशोरवयीन आणि प्रौढ व्यक्ती यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. किशोरवयीन मुलांमध्ये झोप कमी येणं, अभ्यासातील गती मंदावणं, उत्साह नसणं आणि एकलकोंडेपणा वाढणं ही लक्षणं असून प्रौढ व्यक्तींमध्ये हेल्युसिनेशन (अस्तित्वात नसलेल्या गोष्टी जाणवणं), विश्वास न ठेवणं, अपूर्ण संवाद, रागाचे झटके, समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न ही सगळी लक्षणं दिसतात. या सगळ्या गोष्टी अतिताणामुळे सुचायला लागतात. त्यामुळे वेळीच तुमच्या लहान मुलांमध्ये या गोष्टी जाणवायला लागल्या तर तुम्ही त्यावर उपचार करायला हवेत कारण त्यावर त्याचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. शिवाय या आजारातून वेळेवर उपचार घेतल्यास बरं होता येतं.

3. ऑटिझम
ऑटिझम हा असा मानसिक आजार आहे जो दोन वर्षाच्या मुलापासूनही होऊ शकतो. दोन वर्षांच्या मुलांमध्ये एकमेकांशी न मिसळणं आणि एकलकोंडेपणाने राहण्याबरोबरच ऑटिझम सुरु होतं आणि मग त्याचा परिणाम बोबडेपणामध्ये होतो. अशी मुलं आपल्याच कामात आनंदी असतात आणि एकच काम बराच वेळ करत बसणं त्यांना खूपच आवडतं. पण हे ऑटिझमच लक्षण आहे हे वेळेतच पालकांनी ओळखायला हवं. वेळोवेळी आपल्या डॉक्टरांकडून योग्य वयात मुलं बोलत नसल्यास, त्यांची तपासणी करून घ्यायला हवी. यामधून मुलं बाहेर नक्की पडतात पण पुन्हा ऑटिझमच्या आहारी जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा मुलांकडे व्यवस्थित लक्ष देत राहायला हवं. याची लक्षणं बऱ्याच अंशी वेगळी असतात. नक्की ती काय असतात ते जाणून घेऊया –

उशीरा बोलायला सुरुवात अथवा बोबडेपणाने सतत बोलणे
वयाला साजेसे नसलेले व्यवहार करणं
बुद्ध्यांक कमी असणं
स्मरणशक्ती कमी असणं
सतत हट्टीपणा आणि निराशा
समाजातील लोकांमध्ये न मिसळणं
हे महत्त्वाचे प्रकार असून मानसिक आजाराने अन्यही काही प्रकार आहेत –
1. राग 
बऱ्याच व्यक्तींना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे वेळेवर आपल्याला कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार नाही ना याची खात्री करून घ्या. कारण राग हा एका मर्यादेपर्यंत ठीक असतो. पण सतत प्रत्येक गोष्टीवरून चिडचिड करून राग येणं हे योग्य नाही.

2. तीव्र झटका 
अचानक शांत असताना विनाकारण अचानक एखादी व्यक्ती चिडत असेल तर त्याला पॅनिक अटॅक म्हटलं जातं आणि हा मानसिक आजाराचा एक भाग आहे. यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची आणि तुमच्या जवळच्या माणसांच्या पाठिंब्याची गरज असते.

3. जास्त खाणं 
बऱ्याचदा काही परिस्थितीमध्ये नक्की काय करायचं हे न कळून बऱ्याच जणांना सतत खायची सवय असते. पण हादेखील एक मानसिक आजाराच आहे. तुम्हाला स्वतःला हे सर्वात पहिल्यांदा जाणवतं. त्यामुळे असं काही झालं तर वेळीच तुम्ही आपल्या जवळच्या माणसांची मदत घेऊन यातून बाहेर यायचा प्रयत्न करा. अन्यथा तुमच्या शरीरावर तर याचा परिणाम होतोच पण त्याहीपेक्षा जास्त मनावर या गोष्टीचा जास्त परिणाम होतो.

4. एकटेपणा
एकटेपणा
आजूबाजूला कितीही माणसं असली तरीही तुम्हाला सतत एकटेपणा वाटणं हादेखील मानसिक आजारच आहे. आपल्यावर कोणीही प्रेम करत नाही आणि आपण एकटे आहोत हे सतत वाटत राहणं योग्य नाही. त्यासाठी तुम्ही तुमचे विचार तुमच्या जवळच्या व्यक्तींंबरोबर शेअर करायला हवेत. अन्यथा याचा शेवट आत्महत्येचे विचार मनात निर्माण होईपर्यंत होतात.

5. आत्महत्येचे विचार
कोणत्याही गोष्टीसाठी सतत मनामध्ये आत्महत्येचे विचार येणं हादेखील मानसिक आजाराचा एक भाग आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तुम्ही डगमगत असाल आणि त्यावर उपाय म्हणून फक्त आणि फक्त आत्महत्या इतकी एकच गोष्ट तुमच्या मनात येत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे असं जर तुमच्याबरोबर सतत होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायला हवी.



मानसिक आजारावर घरगुती उपाय (Home Remedies For Mental Illness In Marathi)
प्रत्येक मानसिक आजारासाठी विविध उपचार केले जातात. अगदी उपचार करण्यासाठी चुंबकीय थेरपीपासून ते शॉक थेरपीपर्यंत सर्व प्रकार आहेत. पण तुमचा आजार नक्की कोणत्या थरापर्यंत पोहचला आहे त्यानुसार या थेरपी आणि उपचार करावे लागतात. त्यामुळे कोणत्याही थेरपी करून घेण्याआधी स्वतःच्या मनाने न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं योग्य. पाहूया काय आहेत नैसर्गिक उपचार –

1. संवाद
बऱ्याचदा केवळ औषधाने आणि बोलण्यानेही हे आजार बरे होतात. कारण यावरचा उपाय असतो तो म्हणजे आपल्या मनात नक्की काय चालू आहे हे दुसऱ्याला स्पष्ट सांगणं. मनात गोष्टी ठेऊन त्या साठत जातात आणि त्यामुळे आपल्या मनावरील ताण वाढत जातो. परिणाम मानसिक आजाराला निमंत्रण असतं. त्यामुळे घडलेल्या वेळीच गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणे हा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक उपाय यावर आहे. संवाद हा खरं तर सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. संवादाशिवाय आयुष्यात काहीही घडू शकत नाही. त्यामुळे बोलल्याशिवाय कोणताही मानसिक आजार बरा होऊ शकत नाही.

2. योगा
योगा हा मानसिक आजारावरील नैसर्गिक उपचारच आहे. योगामुळे तुमची मानसिक शक्ती वाढते आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता अधिक लाभून तुमच्या मनावरील ताण कमी होतो. त्यामुळे हा उपचार अतिशय चांगला आणि लगेच उपचार देणारा आहे. योगा हा बऱ्याच आजारांवरील योग्य उपचार आहे. तुम्ही केलेल्या व्यायामांमुळे तुमच्या शरीराला आणि मनालाही योग्य राखण्यास योगाची मदत होते.

3. ध्यानसाधना
ध्यानसाधना हादेखील तितकाच महत्त्वाचा उपचार आहे. ध्यानसाधनेमुळे तुमचं मनावर चांगलं नियंत्रण राहातं आणि त्यामुळेच मानसिक आजारातून बरं होण्यासाठी नेहमी ध्यानधारणेचा आधार घेतला जातो. अगदी तज्ज्ञांनीदेखील ध्यानधारणा करण्याचे सल्ले दिले आहेत. त्यामुळे मानसिक आजाराची लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही हा सोपा आणि अगदी नैसर्गिक उपचार करून पाहा. ध्यानसाधना हा अतिशय महत्त्वाचा उपचार आहे. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र आणि अगदी महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक विपश्चना केंद्र सापडतील जिथे जाऊन तुम्ही ध्यानसाधना करून आप्लया मनावर योग्य ते उपचार करून घेऊ शकता. महाराष्ट्रातील नाशिक आणि लोणावळा इथे खास यासाठी विपश्चना केंद्र निर्माण करण्यात आली आहेत

Post a Comment

Previous Post Next Post