ग्रामीण पोलिसांना झाली रंगेहाथ अटक....

अमरावती – स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या दोन पोलिसांना, 110 कलमांतर्गत होणारी कार्यवाही निकाली काढण्याकरिता संबंधितांकडून लाच स्वीकारताना अमरावती लाच प्रतिबंधक पथकाने रंगेहात अटक केली असून या प्रकरणातील आरोपी १) श्री. विशाल रामरावजी हरणे, पोलीस हवालदार, ब. न. 1918, स्थानिक गुन्हें शाखा, अमरावती ग्रामीण
२) श्री. प्रशांत महादेवराव ढोके, पोलीस नाईक, ब. न. 1753, स्थानिक गुन्हें शाखा, अमरावती ग्रामीण असे नाव असून दोन्ही आरोपीतांविरुद्ध पोलीस स्टेशन गाडगे नगर अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                एकूण वाचक संख्या
👇👇👇



नंतर लाच प्रतिबंधक अमरावती पथकाने पडताळणी केली. त्यात लोकसेवक विशाल हरणे व प्रशांत ढोके यांनी 1500 रुपयांची लाच मागणी केल्याचे आणि स्वीकारण्यास मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अमरावती लाच प्रतिबंधक पथकाने दिनांक 20 सप्टेंबर रोजी सापळा कार्यवाही केली. त्यावेळी पोलीस हवालदार विशाल रामराव हरणे ह्याने संबंधितास स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण कार्यालयात बोलाविले. तिथे एकूण लाच रकमेपैकी पाचशे रुपये लाच स्वीकारताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. दोन्ही आरोपीतांविरुद्ध पोलीस स्टेशन गाडगे नगर अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटनेची हकीकत अशी आहे की, ग्राम उंबरखेड, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती येथील 55 वर्षीय इसमाने अमरावती लाच प्रतिबंधक कार्यालयाकडे दिनांक 10 ऑगस्ट 2022 ला तक्रार दिली की, त्याच्यावर कलम 110 प्रमाणे प्रतिबंधक केस दाखल आहे. ही केस निकाली काढण्याकरिता त्याने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस हवालदार विशाल रामराव हरणे तथा पोलीस नाईक प्रशांत महादेवराव ढोके यांना विनंती केली. हे काम करण्याच्या मोबदल्यात या दोघांनीही 1500 रुपयांची लाच मागितली.

Post a Comment

Previous Post Next Post