गांधीनगर येथे वीज पडून 4 शेळ्या ठार तर दोन जण जखमी


देसाईगंज : तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधीनगर ( सावंगी) या ठिकाणी मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वीज पडून चार शेळ्या ठार झाल्या व त्यांची राखण करणारे महिला व पुरुष किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.



अंजीरा रमेश कुथे वय ४५ वर्ष व सोमा वकटू बेंद्रे वय ६५ वर्ष हे घरच्या मालकीच्या शेळ्या चारण्यासाठी नेले होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास
अचानक पावसाला सुरुवात झाली. शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळली. यात चार शेळ्या जागीच ठार झाल्या. राखनदार हे थोड्या दूर अंतरावर असल्याने त्याना विजेचा सौम्य झटका बसला. त्याना वेळीच प्राथमिक आरोग्य केंद्र सावंगी या ठिकाणी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज या ठिकाणी हलविण्यात आले. मृत शेळ्यांचा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटना स्थळी येऊन केला.

Post a Comment

Previous Post Next Post