सक्षमीकरणासाठी एकमेकांचे अनुभव खुप महत्त्वाचे असतात - उपशिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे

अक्षराज : दिलीप अहिनवे 
मुलुंड 

(मुंबई उपनगर), दि. २४ : मुलुंड 'टी' विभागातील गोशाळा मार्ग शाळा सभागृहात २३ सप्टेंबर रोजी शालेय गुणवत्ता विकास मुख्याध्यापक सहविचार सभा आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. एस व टी विभागातील सर्व मुख्याध्यापक या सभेला उपस्थित होते. शहर साधन केंद्र क्र. ६ चे कर्मचारी, मुख्याध्यापक व अधिकारी वर्गाने उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
           कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपशिक्षणाधिकारी (पूर्व उपनगरे) किर्तीवर्धन किरतकुडवे, अधिक्षिका सायली सुर्वे व सीमा चतुर्वेदी (पूर्व उपनगरे), 'एस' विभागाच्या प्रशासकीय अधिकारी (शाळा) आरती खैर, 'टी' विभागाचे प्रशासकीय अधिकारी (शाळा) नंदु घारे, विभाग निरिक्षिका कांचन गोसावी व रामचंद्र गोडे तसेच कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर हे उपस्थित होते.
          गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकाची भूमिका, तंत्र स्नेही शिक्षण, शैक्षणिक साहित्याचा वापर तसेच शालेय गुणवत्ता वाढीसाठी काय प्रयत्न करायला हवेत याबाबत प्रमुख मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. शहर साधन केंद्र क्र. ६ च्या प्रमुख व मार्गदर्शक आरती खैर व विषय तज्ज्ञ यांनी गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या उपक्रमांचे पीपीटी द्वारे उत्तम सादरीकरण केले. निवडक मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 



          सभेचे प्रास्ताविक 'एस' विभागाच्या प्रशासकीय अधिकारी (शाळा) आरती खैर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. पंढरीनाथ भोईर यांनी तर शेवटी सर्वांचे आभार आपल्या विनोदी व खास शैलीत 'टी' विभागाचे प्रशासकीय अधिकारी (शाळा) नंदु घारे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post