आता वाघ आणि हत्तीसह लांडग्याने घातला धुमाकूळ

लांडग्यांनी दोन मेंढ्यांची केली शिकार


लाखांदूर : शिकारीच्या शोधात गावात शिरलेल्या लांडग्यांनी गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांची शिकार केल्याची घटना तालुक्यातील कुडेगाव येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गत महिनाभरापासून तालुक्यात लांडग्यांचा धुमाकूळ सुरू असून, अनेक शेळ्यांची शिकार केली आहे.

गिरीधारी पंढरी बरडे (३२, रा. कुडेगाव यांनी आपल्या शेळ्या बुधवारी रात्री घराजवळील गोठ्यात बांधल्या होत्या. रात्रीच्या सुमारास पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याच वेळी लांडग्यांनी गावात प्रवेश केला. गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांवर हल्ला चढविला. त्यात दोन्ही शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती लाखांदर वनविभागाला दिली.

Post a Comment

Previous Post Next Post