सासू सुनेच्या वादाचे थक्क करणारे कारण; सुनेने घेतला सासूचा चावा

अंबरनाथ - सासू सुनांमध्ये वेगववेगळ्या कारणावरून वाद होताना आपण अनेकदा ऐकले आहे पाहिलेही आहे मात्र आता तुम्हाला आम्ही जे वादाचे जे कारण सांगणार आहोत ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल अंबरनाथच्या वडवली सेक्शन परिसरात समोर आला आहे. स्तोत्र पठण करणाऱ्या सासुला सुनेच्या मोठ्या आवाजात टीव्ही पाहण्याचा त्रास झाला. त्यावेळी संतापून सासूने टिव्ही बंद केला. त्यावरून सासू सुनांमध्ये वाद सुरू झाला. वादात हातवारे करत बोलणाऱ्या सासुच्या हाताच्या तीन बोटांचा सुनेने थेट चावा घेतला. हे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून सासुला चावा घेणाऱ्या सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ शहरातील पूर्वेच्या वडवली सेक्शन परिसरात एका कुटुंबात सोमवारी सकाळी वेगळ्या प्रकारचा वाद झाला. यातील 60 वर्षीय सासू या घरात स्तोत्र पठण करत होत्या. त्याचवेळी 32 वर्षीय सुनेने टिव्हीचा आवाज वाढवला. स्तोत्र पठण करण्यात अडथळा आल्याने सासू बाईंनी थेट टिव्ही बंद करून टाला. त्याचा सुनबाईंना रग आला. त्यामुळे सुनबाईंना सासुबाईंना थेट सुनावण्यास सुरूवात केली. हे माझे घर आहे, या घरात मी काहीही करेन, अशा अर्वाच्च भाषेत सुनबाईंना सासुबाईंना खडसावण्यास सुरूवात केली.

त्याचवेळी सासुबाईंनाही संताप आला. हे माझ्या नवऱ्याचे घर आहे, असं सासूबाई सुनबाईंना सांगू लागल्या. हे करत असताना सासुबाईंना हातवारे करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी संतापलेल्या सुनबाईंनी हातवारे करणाऱ्या सासुबाईंना थेट शिवीगाळ करत सुरू असलेल्या हातवाऱ्यांवेळी उजव्या हाताच्या तीन बोटे चक्क चावली. त्यामुळे सासुबाईंना दुखापत झाली. त्याचवेळी सासुबाईंनाही संताप आला. हे माझ्या नवऱ्याचे घर आहे, असं सासूबाई सुनबाईंना सांगू लागल्या. हे करत असताना सासुबाईंना हातवारे करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी संतापलेल्या सुनबाईंनी हातवारे करणाऱ्या सासुबाईंना थेट शिवीगाळ करत सुरू असलेल्या हातवाऱ्यांवेळी उजव्या हाताच्या तीन बोटे चक्क चावली. त्यामुळे सासुबाईंना दुखापत झाली.

सासु सुनांच्या सुरू असलेल्या वादात मग मुलानेही प्रवेश केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आपल्या पतीलाही या सुनबाईने शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्हाला बघुन घेईल अशी धमकीही दिली. या प्रकारानंतर सासुबाईंना थेट अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि याप्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीनंतर सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सासु सुनांच्या सुरू असलेल्या वादात मग मुलानेही प्रवेश केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आपल्या पतीलाही या सुनबाईने शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्हाला बघुन घेईल अशी धमकीही दिली. या प्रकारानंतर सासुबाईंना थेट अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि याप्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीनंतर सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post