मोवाड येथे चंडिका माता देवस्थान नवरात्र उत्सव

राजेंद्र बागडे नागपूर विभागीय प्रतिनिधी ता. 27

      सनातन धर्मं जागृत चंडिका माता देवस्थान मोवाड येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा नवरात्र उत्सव साजरा होत आहे. 26 तारखेला घट स्थापना नंतर जस, दांडिया, भजन, इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या नवरात्र उत्सवाची समाप्ती दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोज मंगळवारला होईल चार तारखेला दुपारी दोन वाजता नेहेमी प्रमाणे शत्रपूजन तर तीन वाजेपासून महाप्रसाद ला सुरुवात होईल वरील नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमाला विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुनिल केदार, खासदार कृपाल तुमाने, आशिष जयस्वाल, आशिष देशमूख, चरणसिग ठाकूर, सलील देशमूख, मंदीराला धावती भेट देणार आहे. महाप्रसादाला खासदार कृपाल तुमाने व नागपूर येथील माजी नगरसेवक जनेश्वर पेठे, हे सुद्धा हजर राहतील,शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घेण्याचे आवाहन चंडिका माता देवस्थानचे संचालक ओमप्रकाश पालीवाल यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post