दारू विक्रेत्यावर बसला एक लाखाचा दंड

चामोर्शी : चामोर्शी न्यायालयाने दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपींना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कृष्णनगर येथील सुब्रत सुभाष ढाली वय ३२ वर्ष, विक्रमपूर येथील अजित मेघनाथ बिश्वास अशी आरोपींची नावे आहेत. २२ जून २०२२ रोजी जयनगर येथे आरोपी दारूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांना मिळाली.

माहितीच्या आधारे वाघ यांनी जयनगर येथे सापळा रचला असता आरोपी हे दुचाकीवर दारू वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. त्यांना थांबवून वाहनाची पाहणी केली असता एका पोत्यात २५ लीटर मोहफुलाची दारू आढळून आली. ही दारू जप्त केली. आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून पोहवा राजू उराडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. डी. मेश्राम यांनी आरोपींना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. अॅड. डी. व्ही. दोनाडकर यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली.

Post a Comment

Previous Post Next Post