पंतप्रधान मोदीं विरोधात लिहला म्हणुन पोलीस उपनिरीक्षक निलंबित...

भंडारा– पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांबाबत आपत्तीजनक मजकूर पोस्ट करून समाजात वैमनस्य निर्माण केल्याबद्दल भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सूर्यवंशीच्या निलंबना सोबतच आता या प्रकरणी त्याची चाैकशी करण्यात येणार आहे अशी माहिती एसपी लोहित मतानी यांनी दिली.

दरम्यान या कारवाईमुळे भंडारा आणि नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.भंडारा येथे तैनात असलेला उपनिरीक्षक सूर्यवंशी काही दिवसांपासून नेता आणि व्यवस्थेविरुद्ध वादग्रस्त मजकूर पोस्ट करीत होता. फेसबुकवर त्याच्याशी निगडित व्यक्तींची संख्या कमी असल्यामुळे त्याच्या पोस्टकडे कोणाचे लक्ष गेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सूर्यवंशी गंभीर पोस्ट करीत तो नेता, त्यांचे कुटुंबीय सोबतच धार्मिक आयोजनांवर वैमनस्य निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकत होता.शनिवारी सामाजिक कार्यकर्ता सुशील चौरसिया यांनी नागपुर जिल्ह्याच्या कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सूर्यवंशी विरुद्ध (कलम 294, 295 (अ), 500, 504, आयटी एक्ट 67) गुन्हा दाखल केला. ही बाब लक्षात घेता भंडाराचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सूर्यवंशींच्या निलंबनाचा आदेश काढला आहे.


विशेष म्हणजे सूर्यवंशी शिपाई म्हणून नागपूर पोलीस दलात सामील झाला होता. त्याने तहसील तसेच पाचपावली ठाण्यात काम केले आहे. बंगाली पंजामध्ये गुन्हेगारांच्या दोन गटांत झालेल्या गोळीबाराच्या तपासात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल त्याला तहसील ठाण्यातून नियंत्रण कक्षात हलविण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात त्याची भंडारा येथे बदली झाली. यापूर्वी त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता परंतु कोणी त्याला गांभीर्याने घेतले नव्हते मात्र आता गुन्हा नोंद झाल्यानंतर भंडारा पोलीस अधिक्षकांनी त्याला निलंबित केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post