सारख्या-सारख्या शरीर संबंधांसाठी 89 वर्षांच्या आजोबाने आजीचे केले जिने हराम

बडोदा- पोलिसांच्या हेल्पलाईनवर (helpline)आलेल्या या कॉलमुळे पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या या हेल्पलाईनवर एका 87 वर्षांच्या म्हाताऱ्या (87 years old wife)आणि आजारी महिलेने फोन केला. या वृद्ध महिलेने हेल्पलाईन नंबरवर आपल्या 89 वर्षांच्या पतीची (89 years old husband) तक्रार केली आहे. वारंवार शरीर संबंधांच्या मागणीला वैतागलेल्या या म्हाताऱ्या महिलेने पतीपासून सुटका करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. ही म्हातारी बाई आजारी असल्याने पतीची मागणी वारंवार पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे या पतीवर उपाय करावा अशी विनवणी या महिलेने पोलिसांना केली आहे.गुजरातमध्ये महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी अभयम नावाने हेल्पलाईन चालवली जाते. त्यात बडोद्यात हा फोन आला आहे. अभयम हेल्पलाई्नच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की., या दोघांमध्ये गेली अनेक वर्षे चांगले संबंध राहिलेले आहेत. मात्र गेल्या वर्षी ही महिला आजारी पडली. आता तिला पलंगावरुन हलताही येत नाहीये. तीची हालचालही मंदावली असून मुलाच्या आणि सुनेच्या मदतीने ती घरात चालू शकते आहे. या वृद्ध महिलेचा पती तिची अवस्था माहित असतानाही तिच्याकडे शारिरिक संबंध ठेवण्याची मागणी करतो आहे. त्यासाठी तो तिच्यावर दबावही टाकत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महिलेने नकार दिला तर भांडण
या वृद्ध पत्नीने शरीर संबंधांना नकार दिला तर तिचा रिटायर्ड इंजिनिअर नवरा तिच्या भांडण करतो. या भांडणावेळी हा पती पत्नी आणि मुलावरही ओरडतो. त्यामुळे ही बाब शेजाऱ्यांनाही हा प्रकार माहित झाला आहे. पित्याच्या या त्रासाला कंटाळून अडचणीत आलेल्या कुटुंबाने अखेर तक्रार केली आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की – दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडून कॉल आल्यानंतर आम्ही तातडीने त्यांच्या घरी पोहचलो आणि त्या वृद्ध गृहस्थाची भेट घेतली. या कृत्यामुळे तुमची प्रतिमा मलिन होते आहे. तसेच तुमची बायकोही चिंतेत असल्याचे आम्ही त्यांना सांगितले.आरोपी पतीचे या टीमने कौन्सिलिंग केले आणि त्यांचे लक्ष इतर बाबीत गुंतवा असा सल्लाही त्यांना देण्यात आला. वरिष्ठांचा एखादा क्लब जॉईन करा, असा सल्लाही त्यांना देण्यात आला. योगा करण्याचा सल्लाही त्या वृद्ध पतीला देण्यात आला. त्यांच्या होणाऱ्या इच्छेबाबत डॉक्टरांना भेटण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post