ई-पिक पाहणी बाबत अतिशय महत्वाची सूचना


                        तलाठी साझा सर्व शेतकरी बंधूंना सूचित करण्यात येते की, दिनांक 20/09/2022 रोजी ई-पिक पाहणी बाबत तलाठी, मंडळ अधिकारी यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे घेण्यात आले. सदर प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांची माहिती हि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय महत्वाचे असल्यामुळे सदर पुढील सूचनांचे शेतकरी बांधवांनी अवलोकन करून कार्यवाही करावी. सूचना पुढीलप्रमाणे 

1)ई-पिक करण्यासाठी “ई-पिक वर्जन 2” (आवृत्ती 2.0.0.3) डाऊनलोड mobile मध्ये करावे.

2)सदर app ई-पिक करताना अक्षांश व रेखांश घेत असल्यामुळे तसेच तुमच्या जमिनीचे geo fencing झालेली असल्यामुळे (geo fencing म्हणजे सदर app ला तुम्ही दर्शविलेले स.न.चे प्रत्यक्ष ठिकाण माहित आहे.) app सांगेल त्याप्रमाणे त्याठिकाणी जाऊन पिकाचा फोटो काढून पिक पाहणी करावी. परंतु तसे न केल्यास व दुसऱ्या ठिकाण चा फोटो घेतल्यास पिक पाहणी साठवली जाईल परंतु तुमच्या सात-बारावर आपोआप येणार नाही. ती चुकीची होईल व 15 ऑक्टोबर नंतर तलाठी ला रितसर अर्ज, मोका तपासणी करूनच दुरुस्ती करता येईल.

3)ई-पिक पाहणी शेतकऱ्याद्वारे स्वयंप्रमानीत मानली जाईल. म्हणजेच शेतकऱ्याने केलेली ई-पिक हि त्याने स्वघोषित केलेली असेल. तसे स्व-घोषणापत्र ई-पिक app मध्ये घेतले जाईल. (शेतकऱ्याची स्व-जबाबदारी असेल)(ई-पिक चुकल्यास 15 ऑक्टोबर नंतर तलाठी ला रितसर अर्ज, मोका तपासणी). मग ई-पिक न केल्यास काय होईल नंबर 4 ची सूचना अवश्य वाचावी.

व्हिडियो



4)किमान 10% तपासणी तलाठी यांचेमार्फत – म्हणजेच गावातील सर्व स.न.ची ई-पिक होणे अनिवार्य आहे. कारण 10% तपासणी तलाठी यांचेमार्फत 15 ऑक्टोबर नंतर रितसर अर्ज देऊन चुकलेल्या स.न.ची होणार. ( चुकलेली ई-पिक पाहणी प्रकार- 1) ई-पिक करताना फोटो अस्पष्ट आल्यास 2) दुसऱ्या ठिकाण चा फोटो घेतल्यास पिक पाहणी साठवली जाईल परंतु तुमच्या सात-बारावर आपोआप येणार नाही ई.कारणे) त्यामुळे सर्व खात्याचे ई-पिक होणे गरजेचे आहे.

5) शेतकऱ्याद्वारे केलेली ई-पिक पाहणी चूक वाटल्यास 48 तासात त्याला फक्त एकच वेळ दुरुस्त करता येईल. त्यामुळे अति घाई ने ई-पिक न करता आपण मागील वर्षाच्या खसऱ्याचा आधार घेणे योग्य राहील.

6) किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदविण्याची सुविधा app मध्ये असेल.- अतिशय महत्वाचा विषय धान महामंडळ ला तुमच्या ई- पिक ची माहिती दिली जाईल. अशी माहिती प्रशिक्षणात मिळाली.त्यामुळे ज्यांना स्वतःचे धान्य मंडळ ला द्यायचे आहे त्यांनी योग्य पद्धतीने ई-पिक करावी. व पिक असलेल्या सर्व सर्वे नंबरची ई-पिक 15 ऑक्टोबरपूर्वी करावी. आपल्याकडे अजूनही ई-पिक चे प्रमाण कमी आहे.त्यामुळे लवकरात लवकर ई-पिक करावी.

7) online वनहक्क सातबारा बाबत- ई-पिक करावे कि करू नये याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे. 

8) भोगवटा वर्ग 2 ( शासनाकडून मिळालेल्या जमिनी) चे खातेदारांनी शेतामध्ये पिक असल्यास ई-पिक पाहणी अवश्य करावी. 

व्हिडियो



8)तलाठी यांना करावयाचा अर्ज format लवकरच whats app ग्रुपवर पाठविण्यात येईल.

9)वरील माहिती ही जास्तीस जास्त खातेदार पर्यंत पोचवावी. ज्या खातेदारांना ई-पिक माहित आहे त्यांनी दुसऱ्यास सहकार्य करावे हि विनंती.धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post