जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली* *जिल्हयातील पूरस्थितीबाबत संक्षिप्त अहवाल*



*दिनांक: 22-09-2022, सकाळी- 10.00 वा.*
-----------
*1. वैनगंगा नदी :*
संजय सरोवर धरणाचे 10 पैकी 10 गेट बंद असुन Power House व्दारे 200 क्युसेक्स (5.66 क्युमेक्स) विसर्ग सुरु आहे.
गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट 0.50 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 1,36,175 क्युसेक्स (3,856 क्युमेक्स) आहे.
चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 2,70,230 क्युसेक्स (7,656 क्युमेक्स) आहे. 
वडसा, वाघोली बुटी व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.




*2. वर्धा नदी :*
उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे 13 पैकी 5 गेट 0.50 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 14,267 क्युसेक्स (404 क्युमेक्स) आहे.
निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 7 गेट 0.30 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 6,922 क्युसेक्स (196 क्युमेक्स) आहे.
बामणी (बल्हारशा) व सिरपूर टाऊन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.

*3. प्राणहिता नदी :* 
महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.
 
*4. गोदावरी नदी :*
श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 25 गेट उघडलेले असुन विसर्ग 2,53,313 क्युसेक्स (7,173 क्युमेक्स) आहे. 
लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 85 गेट उघडलेले असुन विसर्ग 5,12,810 क्युसेक्स (14,521 क्युमेक्स) आहे. 
कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.  

*5. इंद्रावती नदी :*
चिंदनार, जगदलपूर व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे. 
*पर्लकोटा* नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार *इशारा पातळीच्या खाली* आहे.
---- 
 *नागरिकांना सूचना:*
*🔴  पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व उर्ध्व भागातील धरणातून विसर्ग सोडण्यात येत असल्याने गोसीखुर्द धरणातुन 6,000 ते 8,000 क्युमेक्स पर्यंत विसर्ग टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे.*
🟡 वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे व उर्ध्व भागातील धरणांमधून विसर्ग प्रवाहीत केल्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढलेली असल्याने नदीकाठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.

Post a Comment

Previous Post Next Post