मसाज करण्यासाठी आली होती महिला, तोंडात बोळा कोंबून केला बलात्कार; विरोध केला म्हणून.

भोपाळ, : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 5 ते 6 दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. अखेर या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसात पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटकही केली आहे. आरोपीची कहाणी ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. आरोपीने महिलेसोबत बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केली होती. याशिवाय मृतदेहाजवळ अनेक तास बसून राहिला. आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली.



हत्याकांडाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपी चंदन गौड भागातील राहणारा आहे. या घटनेनंतर तो गायब झाला होता. आरोपी छोटी-मोठी औषधं देण्याचं काम करतो. महिला देखील कमरेत वेदना जाणवत असल्याने त्या दिवशी चंदनच्या घरी मसाज करण्यासाठी गेली होती. यादरम्यान चंदन गौड मसाज करीत असताना अश्लील कृत्य करू लागला. महिलेने जेव्हा याचा विरोध केला तर त्याने महिलेच्या डोक्यात काठीने वार केला. पाय आणि हात बांधले, तोंडात कापडाचा बोळा कोंबला. महिला बेशुद्धावस्थेत असताना तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ज्यानंतर आरोपी महिलेला घरातच सोडून बाहेर निघून गेला. घरी आल्यानंतर तो जेवला आणि रात्री वेळ पाहून महिलेचा मृतदेह बाहेर फेकून दिला.पोलीस मृतदेहाचा तपास करण्यासाठी तेथे आल्यावर आरोपीदेखील तेथेच होता. पोलीस चौकशी करीत असल्याचं पाहून आधी तो मुरारमधील बडा गाव येथे गेला. येथे तो दारू प्यायला आणि एका वाहनाला धडकला. जखमी झाल्यानंतर त्याना रुग्णालयात दाखळ करण्यात आलं. रुग्णालयात दोन दिवस उपचार केल्यानंतर आपल्या सासरी पोहोचला.


यादरम्यान हत्या झाली त्या भागात पोलीस तपास करीत होते. परिसरात त्यांनी अनेकांची चौकशी केली. यावेळी एका खोलीचा दरवाजा बंद होता. त्यात राहणारा व्यक्तीही गायब होता. यामुळे पोलिसांना संशय़ आला. यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं. चौकशीत चंदनने आपला गुन्हा कबुल केला आहे. सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post