पोलीस अधिकाऱ्यांच्या विश्वास बसला अन त्याने मुलीसोबत लगट सुरू केली

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आलेली असून तुला आणि तुझ्या कुटुंबियांना गुरुचा शाप लागेल अशी भीती दाखवत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी ही एका पोलिस अधिकाऱ्याची मुलगी असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपीचे नाव सुरेश कुमार अवस्थी ( वय 58 ) असे असून एका आयटी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये तो काम करतो. अंधेरीतील हा रहिवासी असून त्याने आपल्या अंगात दैवी शक्ती आहे असे भासवत त्याने पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन केला होता. पोलिस दलात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याचा देखील या आरोपीवर विश्वास बसला आणि त्यानंतर त्याने त्यांच्या मुलीसोबत लगट करण्यास सुरू केले.

पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार 2019 मध्ये ती अल्पवयीन असताना त्याने या मुलीला आपल्या घरी बोलावले आणि प्रसादामध्ये तिला गुंगीचे औषध दिले त्यानंतर त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. झालेल्या प्रकाराचे त्याने आपल्या मोबाईलमध्ये चित्रण केले त्यानंतर तिला ब्लॅकमेल करण्याची धमकी देत कुर्ला आणि अंधेरी येथील परिसरात त्याच्या घरी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले.पीडित मुलीने घाबरून त्याच्या विरोधात तक्रार दिली नाही मात्र त्याचा सततच ब्लॅकमेलचा त्रास होत असल्याने अखेर तिने पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी त्याच्या विरोधात 376 328 506 पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post