अखेर... पोलीस स्टेशनमध्ये दांडिया खेळणारे ते दोन पोलीस निलंबित

वणी: पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री फौजदार व अमलदारात चांगलीच फ्रीस्टाईल झाली होती. या घटनेने पोलिसांची अब्रू वेशीवर टांगल्या गेली होती. घटनेचे गांभीर्य बघून उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अहवाल पाठवला होता. याची दखल वरिष्ठांनी घेतली असून त्या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.



पोउपनि शिवाजी तोलबा टिपुर्णे, पोना धिरज देवानंद चव्हाण या दोघांनी वाद करुन पोलीस स्टेशन चे आवारामध्ये एकमेकांना मारहाण केली. या गंभीर घटनेचे पडसाद चांगलेच उमटताना दिसत असून पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी 'त्या' दोघांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

लोकसेवक या पदाला न शोभणारे बेशिस्त,
बेजबाबदारपणाचे व पोलीस अधिकारी व अंमलदार या पदास अशोभनीय गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यावर असतांना एकमेकांना सदभवनेची वागणुक न देता किरकोळ कारणावरुन वाद करुन पोलीस स्टेशन चे आवारामध्ये एकमेकांना लाथा बुक्यांनी मारहाण करणे म्हणजेच पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन करण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


वणी पोलीस ठाणे 'राम' भरोसे असल्याचे दिसत असून गुन्ह्याचा आलेख वाढताना दिसत आहे, दिवसाढवळ्या चोरी, लुबाडणूक, फसवणुकीच्या घटना घडताहेत.


त्यातच पोलिसांनी पोलिसालाच मारहाण करणे योग्य नाही. यामुळे ठाणेदारांची कार्यप्रणाली आणि
कर्मचाऱ्यांवरील वचक संपुष्टात आल्याचे हे द्योतक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post