लाचखोर ग्रामसेवक कैलुके एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया :-  जल ही जीवन है, ही म्हण सर्व प्रचलित आहे. त्यातच पाणी पुरवठा विभागांतर्गत गावातील नळ जोडणी व पाईप लाईन विस्तारीकरणाच्या कामातील देयके देण्यासाठी पिलाच्या तीन टक्के रक्कमची मागणी करणारा लाचखोर ग्रामसेवक अखेर पिण्याच्या पाण्यासाठी १० हजार रुपयात अडकला. ही घटना देवरी तालुक्यातील कडीकसा अंतर्गत येणाऱ्या ग्राम गणुटोला येथील त्या लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे बंडु मारोतराव कैलुके

सविस्तर असे की, तक्रारदार हे कंत्राटदार आहेत. तसेच त्यांचे मामा बांधकाम कंत्राटदार असून ट्रेडर्स एन्ड कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम करतात. तक्रारदाराचे मामा गट ग्रामपंचायत कडीकसा अंतर्गत येणाऱ्या कडीकसा व गणुटोला येथे जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत जल जीवन मिशन वैयक्तीक नळ जोडणी व पाईप लाईन विस्तारीतचे काम त्यांना मंजुर झाले. 

पहिल्या टप्प्यातील त्यांचे ३ लाख ७२ हजार रुपयांचे देयके त्यांना मिळाले तसेच गणुटोला येथील पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण झाले असून त्याचेही देयके २ लाख ४५ हजार रुपये मंजुर झाले. ते देयके ग्रामपंचायत कडून घेणे बाकी होते, यासाठी तक्रारदार हे ३० ऑगस्ट रोजी कडीकसा येथे गेले असता, आरोपी ग्रामसेवक कैलुके यांनी दोन्ही बिल मंजुर करण्यासाठी तीन टक्क्याप्रमाणे १८ हजार रुपयाची मागणी केली. परंतु लाच देवून देयके मंजुर करण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारने २ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे २ सप्टेंबर रोजी तक्रार नोंदविली. तक्रारीची सहनिशा करून आज यशस्वी सापडा रचण्यात आला. दरम्यान तडजोडीअंती १० हजारात हा सौंदा मंजुर झाला. त्या अनुषंगाने देवीर येथील पंचायत समितीच्या मुख्य मार्गाजवळ यशस्वी सापडा रचून आरोपी कैलुके याला १० हजाराची लाच स्विकारतांना पंचासमक्ष रंगेहात अटक करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोनि. अतुल तवाडे, सफौ. विजय खोब्रागडे, पो. हवा. मिल्कीराम पटले, नापोशि. राजेंद्र बिसेन, संतोष शेंडे, संतोष बोपचे, मंगेश कहालकार, दीपक बाटबर्वे आदींनी पार पाडली.

Post a Comment

Previous Post Next Post