उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले , रेती वाहतुकीसाठी ४५ हजारांवर तडजोड

उमरेड:-  तालुक्याच्या बेला पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप पुंडलिक सपाटे (वय ५५) रा. फ्रेंड्स कॉलनी नागपूर) यांना रेतीची सुरळीत वाहतूक करण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. पथकाने ही कारवाई गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास बेला पोलिस स्टेशन हद्दीतील सोनेगाव ( लोधी) येथील राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यावर केली.

प्राप्त माहितीनुसार उपनिरीक्षक दिलीप सपाटे यांनी बिलालनगर, तालुका मंगरूळपीर, जिल्हा वाशिम येथील वाहतूकदाराला बेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रेतीची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रतिट्रक १५ हजार रुपये प्रमाणे ७५ हजार रुपयाची मागणी केली होती. तडजोडीनंतर ४५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र वाहतूकदराला लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार केली. हैदराबाद- नागपूर मार्गावरील सोनेगाव लोधी ढाब्यावर लाचेची रक्कम देण्याचे ठरले . ठरल्याप्रमाणे उपनिरीक्षक दिलीप सपाटे हे गुरुवारी रात्री ९ वाजता आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आधीच सापळा रचला होता. पथकाने सपाटे याला ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच रंगेहात पकडले. या कारवाईने बेला पोलिसांत खळबळ माजली आहे.

सपाटे त्रासदायक होते उपनिरीक्षक दिलीप सपाटे हे सात महिन्यांपूर्वी कळमेश्वर येथून बदलीवर बेला येथे आले. त्यांची कारकीर्द विवादास्पद राहिली आहे. त्यांच्या बद्दलखासगी वाहतूकदारांकडून कुठल्या न कुठल्या बहाण्याने पैसे उकळण्याच्या तक्रारी येतच होत्या. सदर तक्रारकर्ता रेती वाहतूकदार त्यांच्या जाचाला कंटाळला होता. त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

Post a Comment

Previous Post Next Post