चांदेश्वर- सगनापुर पुलाची दुरवस्था पुलावर खड्डे की खड्ड्यात पुल गावकऱ्यांना प्रश्न मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष

आवागमन करताना नागरिकांची दमछाक

पूलावरील खड्डयामुळे वाढली अपघाताची शक्यता
               

 चामोर्शी :- तालुक्यातील चांदेश्वर ते सगनापुर या पूलाची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावर गेले असता पूलावर खड्डे की खड्ड्यात पुल असा नागरिकांना प्रश्न पडत आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असल्याने पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे
               सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने पूलावरील बहुतांश भाग वाहून गेला आहे त्यामुळे या पूलावरून नेहमी पाणी वाहत असल्यामुळे चांदेश्वर आणि सगनापुर रेश्मिपूर येथील नागरिकांना येनापूर तसेच चामोर्शि, आष्टी, गडचिरोली मार्गावर इतर ठिकाणी जाण्यासाठी अडचण होत आहे. अनेक दिवस रस्ता बंद राहत असल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबून पडलेली आहेत शेतीच्या हंगामासाठी शेताकडे जाणेसुद्धा कठीण झाले आहे .यामुळे शेतकरी व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या सा.क्र.१०/६०० या ठिकाणी उंची व पक्क्या पूलाचे निर्मिती करणे अत्यावश्यक आहे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून गावकऱ्यांनी दिला आहे. प्रशासन याकडे का लक्ष देत नाही. असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. सदर पुलाची दुरस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा गावकऱ्यांतर्फे सदर विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post