श्री. तुकाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव आकरे यांचे वृद्धकाळाने निधन

कढोली:- येथील श्री तुकाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव आकरे वय (85) यांचे आज दि.८/९/२०२२ रोज गुरूवारला दुपारी १२.०० वाजता वृद्धकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने राजकीय सामाजिक क्षेत्रात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 9 सप्टेंबरला सकाळी 9.00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐

Post a Comment

Previous Post Next Post